राज्यात कोरोना निर्बंधातून लवकरच मिळू शकते सूट, जाणून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

पुणे: महाराष्ट्र सरकार कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधापासून पूर्णपणे सूट देण्याच्या विचारात आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, दुकाने आणि रेस्टॉरंट्सचा बंद होण्याचा वेळ वाढवून देण्याचा विचार सरकार करत आहे. तसेच शनिवार आणि रविवारी असलेल्या निर्बंधात सूट देण्याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

पुण्यात पत्रकारांना बोलत असताना अजित पवार म्हणाले की. “ज्या व्यक्तींनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांना निर्बंधातून पूर्ण सूट देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यामुळे इतर नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे प्रोत्साहन मिळेल. “

See also  खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, जाणून घ्या राज ठाकरे असं का म्हणाले?

यासोबतच दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्याची वेळी संध्याकाळी 4 ऐवजी 7 वाजता बंद करायची मागणी होत आहे. याबद्दल बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, ‘आम्ही दुकाने आणि हॉटेल्स यांचा वेळ वाढवण्याचा विचार करत आहोत. मात्र, यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. सोमवारी आम्ही तज्ञांसोबत बैठक घेणार आहोत. त्यानंतर वीकएंड निर्बंधावर सूट द्यायची की नाही यावर निर्णय घेण्यात येईल.”

तिसर्‍या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू…

अजित पवार पुढे म्हणाले, “तिसर्‍या लाटेच्या संभावनेविषयी बरेच शोध अहवाल आले आहेत. यावेळी रुग्णांची संख्या जास्त असू शकते त्यामुळे रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत.’

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment