“अजूनही बरसात आहे” मालिकेतील मनस्विनीची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितीये?
सध्या मराठी टेलीव्हिजन पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल चांगलाच वाढत आहे. अनेक च्यानेल नवनवीन मालिका घेऊन येत आहेत. त्यात स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी आणि त्यासोबतच इतर अनेक आहेत. ज्यावर अनेक लोकप्रिय अश्या मालिका चालू आहेत. सोनी टीव्ही हे एक मालिकांचे च्यानेल. तर सध्या एक मालिका आणि त्यामधील काम करणारी प्रसिद्ध अशी जोडी सध्या घराघरात पोहचली आहेत. अजूनही बरसात आहे हे त्या मालिकेचं नाव. लोकांना विषय खूप आवडत आहेत.
त्याचसोबत त्यात काम करणारे प्रमुख भूमिका उमेश कामात आणि मुक्त बर्वे साकारत आहे. जी जोडी खूप वर्षानंतर लोकं एकत्र काम करताना पाहत आहेत. तर या मालिकेत इतर पात्र ही गाजत आहेत. लोकांना पसंत होत आहेत. त्यापैकी एक पात्र म्हणजे मनस्विनी. तर आता मनस्विनी या लोकप्रिय अश्या पत्राची भूमिका नेमकं कोणती अभिनेत्री सक्र्ती आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असेल तर मग चला जाणून घेऊया सविस्तर की कोण साकारत आहे मनस्विनी ची भूमिका.
अजूनही बरसात आहे या मालिकेत मनु म्हणजेच मनस्विनी ची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री चे खऱ्या आयुष्यातील नाव आहे पूर्वा कौशिक. पूर्व कौशिक हि एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिचं सध्याचे काम लोकांना चांगलेच आवडत आहे. ज्यामुळे सोशल मिडीयावर ही तिचे बरेच चाहते वाढलेले आहेत.
ती मुळची अंबरनाथ ची; पण आता ती ठाण्यात राहते. तिचं लहापण आणि शाळा ही तिथेच झालेली. आपल्याला भगिनी मंडळ हायस्कूल माहिती आहे का ? तर इथे तिचं प्रायमरी तर एस एम टी कॉलेज मधून उच्च शिक्षण झालं.
तिने कॉलेज मध्ये असल्यापासूनच या क्षेत्रात करीयर करायचं ठरवलेलं होतं. तिने सुरुवात नाटकांमधून केली. अनेक एकांकिका, नाटक स्पर्धे मध्ये तिने कॉलेज कडून केले. ज्यामुळे तिला एक अभिनयाच्या सरावाचा बेस मिळाला. आज अभिनेता अभिनेत्री व्हायचं असेल तर नाटक जरुर करावे.
असं तिचं म्हणणं असतं. सतत. कानाची घडी तोंडावर बोट या प्रसाद खांडेकर च्या नाटकातून जी भूमिका केली ती तिला खूप अभिनेत्री म्हणून सशक्त आणि यश देऊन गेली. त्या नंतर तिने कॉमेडीची बुलेट ट्रेन नंतर फुलला सुगंध मातीचा ही सिरीयल करत आता अजूनही बरसात मध्ये उत्तम असे काम करत आहे.
एवढच नाहीतर नंतर डोन्ट वरी हो जायेगा हे संजय खापरे यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत केलेलं नाटक आणि तिचा अभिनय ही चांगलाच गाजला. या सगळ्यानंतर हळूहळु आता पूर्व ही मालिकेत आपला आणि अभिनायचा चांगलाच जम बसवत आहे. सध्या तिच्या यशाचा काळ सुरु आहे. तर तिला या पुढील भावी यशस्वी प्रवासासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या सुरक्षित रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.