राम मंदिर उभारणीसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने दिले दान, इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती.

बॉलीवूडचा ऍ’क्श’न किंग, सुपरस्टार अक्षय कुमार याने देशातील कायमच चर्चेत असलेल्या आणि नुकत्याच वाजतगाजत भूमिपूजन झालेल्या अयोध्येतील बहूप्रतिक्षित प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी दान दिलेले आहे.

या धार्मिक कार्यासाठी स्वतः देणगी देऊन त्याने त्याच्या समस्त चाहत्यांना आवाहन केले आहे. आपल्या अवाहनात अक्षय कुमार म्हणाला की, “अयोध्येत आपल्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदीर उभारणीचे काम सुरू झाले आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. आता योगदान देण्याची वेळ आपली आहे. मी सुरुवात केली आहे. तुम्हीही सामिल व्हा… जय सियाराम!!

ram mandir 1610597622

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे:

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहीमेत आता अभिनेता अक्षय कुमारही सामील झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अक्षयने दान दिले आहे. खुद्द त्यानेच एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. सोबत लोकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Akshay Kumar

 

अक्षयने १ मिनिट ५० सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अयोध्येत आपल्या प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु झालेय, याचा खूप आनंद आहे. आता योगदान देण्याची वेळ आपली आहे.

रामायणात सागरावर सेतू बांधण्यासाठी प्रभू श्रीरामांना आपल्यापरीने मदत करणारी खारूताईची आणि वानरसेनेची कथा अक्षयने व्हिडीओत सांगितली आहे. रामसेतू बांधण्यासाठी चिमुकल्या खारूताईने, वानरांनी आपआपल्यापरीने योगदान दिले.
akshay kumar png 8

आता राम मंदिर उभारण्यासाठी आपल्यापैकी काहींनी वानर बनून, तर काहींनी खारूताई बनून आपआपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, जेणेकरून प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहील.

हे मंदिर भारतातील येणाऱ्या पुढील पिढीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातून सदैव प्रेरणा देत राहील. असे आवाहन अक्षयने केले आहे. दरम्यान, अक्षय कुमार ‘राम सेतू’ असे नाव असलेला सिनेमा देखील लवकरच घेऊन येणार आहे. यासाठी त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मुंबईत चर्चा देखील केली होती.
akshay kumar 1 1486713658

नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या दिवशीपासून म्हणजेच १५ जानेवारीपासून विहिंपचे कार्यकर्ते देशात घरोघरी जाऊन वर्गणी जमा करत आहेत. देशातील चार लाख गावांमध्ये जवळपास ११ कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची विहिंपची मोहीम आहे.

देशातील प्रत्येक जात, समाज आणि पंथाच्या नागरिकांचा देशातील या भव्य मंदिराला हातभार लागला पाहिजे, अशी यामागची संकल्पना आहे. देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  आपल्याच बहिणीवर खूपच ज'ळ'त होती अभिनेत्री करीना कपूर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

Leave a Comment