बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार या कारणांमुळे पाहतो मराठी चित्रपट, कारण वाचून थक्क व्हाल!
मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट या दोन्हींचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. कारण ते एकाच मातीत सध्या वाढत आहेत. मुंबईच्या नगरीत सध्या दोन्ही आपापल्या पद्धतीने जोमाने काम करत आहेत. अश्यात त्यामध्ये काम करणारे कलाकार सुद्धा एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. अनेक मराठी अभिनेते अभिनेत्री आज हिंदीत काम करताना दिसत आहेत तर हिंदीतले मराठीत. एवढच नाहीतर काही बॉलीवूड अभिनेते अभिनेत्री हे कलाकार मराठी चित्रपट आवर्जून बघतात.
तर काही निर्मिती करण्यासाठी सुद्धा पुढे येत आहेत. मला आई व्हायचय या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक नुकताच रिलीज झाला. ज्याचं नाव आहे मिमी. होय ! हा चित्रपट मराठीचा रिमेक आहे आणि सध्या खूप चर्चेत आहे. असे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. ज्यामध्ये आज आम्ही उदाहरण देणार आहोत ते बॉलीवूड च्या सुपरस्टार अक्षय कुमारचं. कारण अक्षय कुमार ने नुकतीच एक दोन वर्षांपूर्वी म्हणजेच कोरोना काळाच्या आधी एक मराठी फिल्म निर्मित केलेली आहे. त्यामुळे त्याचं मराठीशी असलेलं नातं हळूहळू खूप घट्ट होत आहे.
आणि अश्यातच आता मराठी फिल्म पाहण्याचे प्रमाण ही सुपरस्टार अभिनेते अक्षय यांचे वाढत आहे. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की अशी कोणती गोष्ट घ’डली की सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार यांना मराठी फिल्म आवडू लागल्या व निर्मित करू वाटायला लागलं.
अक्षय कुमार आता बॉलीवूड च्या सर्वांत श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत अव्वल स्थानावर आलेला आहे. कारण अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेता वर्षाचे ३६५ दिवस कामावर रुजू असतो. कधी सिनेमा तर कधी जाहिरात; पण पैसा कमावणे थांबवत नाही. उगाच नाही म्हणत खिलाडी नंबर वन. तर या अभिनेत्याचे मराठी कनेक्शन नेमके काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत.
आपण अक्षय कुमार या अभिनेत्याचे चाहते आहात का ? तर आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसणे थोडे अवघड जाईल; पण हे तंतोतंत खरे आहे. बॉलिवुड चा हा खिलाडी अभिनेता मराठी चित्रपटांचा खूप मोठा फॅन आहे. हे आपण चुंबक या सिनेमाची निर्मिती केल्यानतर दिलेल्या मुलाखतीत पाहिलच असेल. जी नंतर खूप व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या एका मुलाखती मधे मराठी चित्रपटांबाबत प्रश्न विचारला असता त्यावर अभिनेते अक्षय ने मला मराठी चित्रपट खूप म्हणजे खूप आवडतात आणि मी ते वेळात वेळ काढून कायम बघतो. असे म्हणाला होता. बघितलं किती प्रेम आहे अक्षय कुमार चे मराठी चित्रपटावर. साहजिकच ! कारण आपली मराठी आहेच खूप भारी.
काय झालं होतं अभिनेते अक्षय ला एका इंटरव्ह्यू घेणाऱ्या महिलेने प्रश्न केला होता की मराठी चित्रपट आणि बॉलिवुड चित्रपट हे नेहमीच वा’दाचा विषय बनून राहिले आहेत. मराठी चित्रपटांना सध्या स्क्रीन मिळत नाही ह्याबाबत तुझं काय मत आहे. आणि या प्रश्नावर अक्षय कुमार ने दिलेलं उत्तर आयकून सर्वांनी अभिमानाने टाळ्या वाजवल्या होत्या. कारण विषय आपल्या मराठीचा होता.
विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अक्षय ने म्हंटले की पी व्ही आर आणि सिनेमे ह्यांतले वा’द मिटले आहेत आणि आता पी व्ही आर मधे चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध आहेत. कारण आपण सगळे एक आहोत. एकमेकांनी एकमेकांना प्रेम करायला हवच. सोबत मिळून पुढे जाऊ. तर असे आहे अक्षय चे मराठीशी प्रेमळ कनेक्शन. अक्षय कुमार यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.