अभिनेता अक्षय कुमारला या कारणामुळे येते अभिनेत्री दीपिका पादुकोणची दया, कारण…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील अभिनेत्री दीपिका पादुकोण ही एक टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्यासारखे दीर्घश्रीमंत, लक्जरी लाईफस्टाइल आणि सक्सेसफुल आयुष्य आपण देखील जगावे असे तिच्या सर्व फॅन्सना देखील नक्कीच वाटते.
परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, एक व्यक्ती अशी आहे, जिला दीपिकाची खूपच दया येते. असे त्या व्यक्तीला दीपिका बद्धल का वाटते, हे आपण जाणून घेऊया.
पण तुम्हांला हे ऐकून ध’क्का बसेल की, ती व्यक्ती दुसरी कुणी नसून बॉलीवुड मधील आपला खिलाडी अभिनेता अक्षयकुमार आहे.
अक्षयकुमारने आपल्या मुलाखतीत एकदा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या नात्याविषयी म्हटले होते. त्यावेळी तो बोलला की,”दीपिका पादुकोणची मला खूप दया येते. तसेच मी तिला मनापासून सलाम पण करतो.
कारण ती रणवीर सिंह सारख्या व्यक्तीसोबत राहते.” हे सर्व अक्षयने विनोद बुद्धीने म्हटले होते. तसे तर अक्षयकुमारला रणवीर सिंह जबरदस्त आवडतो. या मुलाखतीत त्याने रणवीर विषयी बोलताना म्हटले की, “मला त्याच्या मध्ये माझी झलक दिसते.”
अभिनेता अक्षयकुमारच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तो लवकरच रोहित शेट्टीचा धमाकेदार चित्रपट “सूर्यवंशी” मध्ये कतरिना कैफ सोबत दिसणार आहे.
या व्यतिरिक्त अक्षयकुमार हा सारा अली खान आणि साऊथ स्टार धनुष सोबत “अंतरंगी रे” ह्या चित्रपटात स्क्रीन शेयर करणार आहे.
तसेच खिलाडी अक्षयकुमार “बच्चन पांडे”, “पृथ्वीराज” आणि “बेल बॉटम” सारख्या मोठ्या चित्रपटांत सुद्धा काम करत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.