अभिनेता अक्षय कुमारला बायको ट्विंकल खन्नाबाबत लग्नाच्या पहिल्या रात्री कळालं असं काही की जाणून थक्क व्हाल..
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सर्वात व्यस्त आणि महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रचंड लोकप्रियता या अभिनेत्याने मिळवलेली आहे. अनेक मोठमोठे प्रोजेक्ट पेंडिंग पडलेले आहेत. सुमारे दीड वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘सूर्यवंशी’ हा अडकलेला चित्रपट या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.
यानंतर, तो अतरंगी रे, बच्चन पांडे, पृथ्वीराज, रक्षा बंधन, राम सेतू आणि सिंड्रेला सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय जेव्हा एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा मोठा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. काय होता खुलासा चला घेऊया सविस्तर जाणून..
अक्षय कुमार कपिल शर्माच्या शोमध्ये आला आणि.. शोमध्ये पोहोचलेल्या अक्षय कुमारने त्याची पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल सांगितले होते, खरं तर, शो दरम्यान, अर्चना पूरन सिंहने अक्षयला प्रश्न विचारला की तो खऱ्या लाइफ किंग म्हणून जगतो का ? ज्याला उत्तर देताना अभिनेता म्हणाला की नाही तो राजासारखे आयुष्य जगत नाही.
यावर अर्चना आणखी एक प्रश्न विचारते की जेव्हा दोघांमध्ये भां’ड’ण होते तेव्हा कोण जिंकते? या प्रश्नाचे उत्तर देताना अक्षय ट्विंकल खन्नाकडे हात करतो आणि म्हणतो की फक्त ट्विंकलच जिंकते. पुढे, अक्षयने पत्नी ट्विंकलबद्दल एक ध’क्कादायक खुलासा केला की लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला कळले होते की मी ट्विंकलसोबत कधीही लढा जिंकू शकणार नाही.
अक्षय पहाटे चार वाजता उठतो. अक्षयची जीवनशैली इंडस्ट्रीतील स्टार्सपेक्षा एकदम वेगळी आहे. तो रात्री उशिरापर्यंत कोणतेही काम करत नाही आणि सकाळी 4 वाजता उठल्यानंतर व्यायाम करायला कधीच विसरत नाही. या जीवनशैलीमध्ये ट्विंकलही साथ देते.
अभिनेत्री बनली लेखिका ट्विंकल ट्विंकल आणि अक्षय कुमारचे लग्न एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.विवाह करण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने एक अट घातली होती की जर चित्रपट फ्लॉप झाला तर ते लग्न करतील. आणि चित्रपट फ्लॉप झाला, त्यानंतर दोघांनी 2001 मध्ये लग्न केले.
लग्नापूर्वी ट्विंकल खन्नाने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते, पण लग्नानंतर ती प्रसिद्धीच्या जगापासून दूर राहून एक चांगली लेखिका बनली आहे. याशिवाय काही वर्षांपासून ट्विंकल चित्रपटांची निर्मितीही करत आहे. ती आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये चालू असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर तिचे मत देत असते. अक्षय आणि ट्विंकलला 2 मुले आहेत.