लग्नाआधीच या सेलिब्रिटी कपल ची लंडन ट्रिप…, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी जोडप्याची सर्वत्र चर्चा…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाआधीची लंडन ट्रीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे मराठी मालिकांमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत.

अक्षय-हार्दिकने त्यांच्या चाहत्यांना अचानकपणे अगदी सुखद धक्का दिला होता. मे महिन्यात या दोघांचा ही अगदी थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. अक्षया-हार्दिकच्या साखरपुड्यामधे काही मराठी कलाकार देखील सहभागी झाले होते. आणि आता हे जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

मात्र त्याआधीच अक्षया आणि हार्दिक लंडनला गेले आहेत. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अक्षय-हार्दिक सध्या लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.  दोघांनी इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून काही व्हिडिओ तसेच लंडनमधील छायाचित्रे शेअर केली आहेत.

See also  ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे प्रेक्षक खूपच चिडले आहेत बबड्यावर, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्यांची प्री-वेडिंग ट्रिप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अक्षयासोबतचा फोटो शेअर करत हार्दिकने ‘हॅशटॅग लंडन’ असे लिहिले. या फोटोत अक्षया-हार्दिक आणखीच क्यूट दिसत आहेत. तसेच हे सेलिब्रिटी कपल सध्या लंडनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे. लंडन ट्रिपवरून परतल्यानंतर अक्षया-हार्दिक लग्नाची तयारी सुरू करणार आहेत.

दोघेही पुण्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या लग्नाला कोण कोण येणार?  अक्षया-हार्दिक कसे दिसणार? ते येत्या काही दिवसात आपल्या सर्वांना कळेलच. मात्र त्याआधी अक्षया आणि हार्दिक एकमेकांना भरपूर वेळ देत आहेत हे नक्की.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाईंनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: थक्क केले. दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या खास मैत्रीच्या चर्चा होत असतात. मात्र त्यांनी कधीही त्यांच्या मैत्रीवर स्पष्ट भाष्य केले न्हवते. अखेर या जोडप्याने आपल्या नात्याला नाव देऊन आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे.

See also  स्वतःचं लग्न बाजूला ठेवून हा प्रसिद्ध मराठी अभिनेता होणाऱ्या पत्नीसह करतोय कोरोना रुग्णांची सेवा...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment