या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लॉ’क’डा’ऊ’नमध्ये या अभिनेत्यासोबत झालं ब्रेकअप, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

तुझ्यात जीव रंगला मधली अंजली बाई तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. ती मालिकेत जरी राणा पहिलवान सोबत लग्न करून प्रेम करून राहत असली तरी खऱ्या आयुष्यात ती वेगळ्या अभिनेत्या सोबत प्रेम करत होती. तो अभिनेता कोण ? त्यांचं प्रेम कधीपासून आणि आता आहे का ? अश्या अनेक तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणुन घेणार आहोत.

अंजली बाई होत्या सुयश टिळक या अभिनेत्या सोबत एंगेज. त्यांचं प्रेमप्रकरण खूप चर्चेत ही आलेलं होतं. त्यांचं फार पूर्वीपासून हे प्रकरण चाललेलं आहे. पण त्याला आता वेगळच वळण लागलेलं आहे. त्यांच्यात आता नेमकं काय झालं ?

त्यांचं प्रेम आता तुटलं आहे. म्हणजे ब्रेकअप झालेलं आहे. अक्षया देवधर म्हणजे अंजली बाई आणि सुयुश टिळक म्हणजे बापमाणूस आणि का रे दुरावा मालिका फेम कलाकार. त्यांचं प्रेम तब्बल दोन वर्षांपासून इंडस्ट्रीत फार व्हायरल झालेलं होतं. त्यांच्या चाहत्यांना जोडी मान्य सुद्धा होती.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नवऱ्याने पारंपरिक दिवाळी फराळाची परदेशात विक्री करून केली करोडोंची उलाढाल...

akshaya and suyash

अक्षया आज तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे फार लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. तिला पुर्ण महाराष्ट्र ओळखतो. आज ती घराघरात पोचलेली आहे. आणि अभिनेता सुयश पण काय कमी लोकप्रिय नाही. जेव्हा त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं तेव्हापासून दोघे सोशल मिडीयावर कायम सोबतचे फोटो टाकायचे. पण त्यांनी मीडियासमोर कधी कबुली दिली नाही. तरीही त्यांनी फोटो सोबत टाकलेले लाईन फार काही बोलून जायच्या.

पण काही महिन्यांपासून दोघेही सोबत दिसत नाही आहेत. त्यांनी गपचूप साखरपुडा सुद्धा केला आहे अश्या चर्चेला सुद्धा खूप उधाण आलं होतं. पण सध्या ते सोशली सोबत दिसत नाहीत. धक्कादायक म्हणजे दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना अन फोल्लो केलेलं आहे. फोटो सुद्धा डीलेट केलेले आहेत.

See also  मराठी अभिनेत्री अश्विनी भावेचे अमेरिकेतील आलिशान घर पाहिले आहे का? घराचे फोटो पाहून थक्क व्हाल...

त्यावरून असा तर्क लावला जात आहेकी त्यांचं ब्रेकअप झालेलं आहे. इंडस्ट्रीत सुद्धा तश्या चर्चा फार रंगलेल्या आहेत. पण त्यांच्या नात्याबद्दल तेच दोघे जास्त मोकळ्या आणि खरेपणाने सांगू शकतात. पण दोघांनीही याबाबतीत सध्या मौन पाळलेलं आहे. अक्षया तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

तर सुयश टिळक सुद्धा नव्या मालिकेत भूमिका करत आहे. जी लवकरच भेटीला येणार आहे. ऑनलाईन लग्न नावाची कलर्स मराठीवर मालिका येत आहे. तिचा प्रोमो सध्या खूप व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना आवडतही आहे. त्यात तो सायली संजीव सोबत काम करत आहे.

त्यांनी जरी काही सांगितलं नसल तरी सध्यस्थिती पाहून असं वाटतं की त्यांचं प्रेम नक्कीच तुटलं आहे. त्यांचं ब्रेकअप झालेलं आहे. आता फक्त त्यांनी यावर शिक्का मारायचा राहिलेला आहे..

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे होणाऱ्या नवऱ्या सोबतचे फोटो झाले व्हायरल...

Leave a Comment

close