रणबीरची पहिली नव्हे तर दुसरी पत्नी आहे आलिया, जाणून घ्या कोण आहे रणबीरची पहिली पत्नी?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो येत्या प्रत्येक दिवशी बॉलिवूडच्या सेलेब्स बद्दल खास माहिती समोर येत असते. सोशल मीडियावर अनेकांच्या पोस्ट लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे नेटकऱ्यांना नेहमी चर्चेसाठी विषय मिळत असतो. अनेक कलाकार काही ना काही कारणाने सोशल मीडियावर सक्रिय होत असतात, खूपशा पोस्ट शेअर करत असतात. शिवाय त्यांच्या आयुष्यातील पर्सनल गोष्टी देखील विशेष लक्ष वेधत असतात. यामध्ये नव्याने गेली कित्येक दिवस आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले रणबीर कपूर आणि आलिया भट पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत.

यावेळी मात्र रणबीरच्या बाबतीत एक खास गोष्ट समोर येत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी रणबीर आणि आलिया यांचा विवाह सोहळा पार पडला होता. अनेक मोठं मोठ्या कलाकारांनी त्यांना आशीर्वाद दिला, सर्व चाहत्यांनी व मित्र मंडळींनी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मीडियावर आजही त्यांच्या लग्नाची विशेष चर्चा असते. दरम्यान रणबीरचे काही बोल हल्ली लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या आणि पहिल्या लग्नाचा विषय चाहत्याना थक्क करत आहे.

See also  या बॉलिवूड अभिनेत्री सोबत चाहत्याने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केल असं काही, ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री आलिया भट सोबत लग्न करण्याआधी रणबीरचे नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्री सोबत जोडले गेले होते. नुकताच एका झालेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा अनेकांसाठी आश्चर्याचा भाग बनला आहे. त्यामुळे आलिया भट देखील नाराज होऊ शकते. दरम्यान रणबीरने आलिया सोबत लग्न करण्याआधी एक लग्न केले असल्याचे सांगितले आहे. आलिया भट सोबत लग्न करण्याआधी दोन वर्षे तिला डेट केले होते. सध्या तरी हे दोघे फिल्म “ब्रह्मस्त्र” च्या प्रमोशन मध्ये बिझी आहेत. दरम्यान रणबीरचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये रणबीर आपल्या आयुष्यातील एक लाजिरवाणा क्षण त्याने शेअर केला आहे. पत्रकारांच्या प्रश्नांची त्याने खुल्याने उत्तरे दिली आहेत. त्याने असे सांगितले आहे की आलीया सोबत लग्न होण्याआधी त्याचे आणखी एका मुलीशी लग्न केले होते. मात्र ही बाब अजून आलियाला माहीत नाही. अनेकजण खूप चकित झाले आहेत, कारण दोन महिन्यांपूर्वी रणबीरचे आलिया सोबत लग्न झाले आहे आणि तो आता आपल्या पहिल्या लग्नाची माहिती देत आहे. त्यामुळे अनेकांना त्याचे आश्चर्य वाटत आहे.

See also  सैराट फेम आकाश ठोसरचे हिंदी वेब सिरीज मध्ये पदार्पण, वेब सिरीजचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मुलाखतीत बोलताना रणबीर सांगतो की जेव्हा तो फिल्म “बेशर्म” च्या शूटिंग साठी भारता बाहेर होता, त्यावेळी ऋषी कपूर आणि नितु कपूर सुद्धा त्याच्या सोबत होते. त्यामुळे त्यांच्या घरात कोणीच न्हवते, ते सर्वजण मोठे कलाकार असल्याने अनेक लोक त्यांचे चाहते असतात. नेहमी त्यांच्या घरासमोर त्यांना पाहण्यासाठी उभे असतात, दरम्यान जेव्हा ते घरी न्हवते तेव्हा एक मुलीने चक्क रणबीरवर फिदा असल्याने, त्याची मोठी फॅन असल्याने तिने त्यांच्या घराच्या दरवाजा सोबत लग्न केले होते. रणबीर म्हणतो की मी त्या मुलीला आजवर पाहिले नाही पण वॉचमनने जेव्हा ही बाब सांगितली तेव्हा मला लाजिरवाणे वाटले.

मित्रहो सेलेब्सच्या आयुष्यात नेहमी असा चकित करणारा प्रसंग घडत असतो. तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  सोनी टीव्हीवरच्या या नव्या हिंदी मालिकेत लवकरच दिसणार मराठी मधील ही जेष्ठ अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment