“माहेरची साडी” फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव…
मराठी मालिका, चित्रपट क्षेत्रातील एक जेष्ठ अभिनेत्री आजही महाराष्ट्राच्या घराघरातल्यांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्र पर्यंत सगळेच त्यांना ओळखतात. कारण काही वर्षांपूर्वी त्यांच्या अनेक अश्या चित्रपटांनी खूप लोकप्रियता मिळवलेली आहे. ज्यामुळे त्यांना सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली होती.
आजही त्या या मनोरंजन सृष्टीत आपले पाय रोवून स्थिर उभ्या आहेत. कधी निर्मात्या तर कधी अभिनेत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. त्यांनी नुकतीच बंद झालेली आई माझी काळूबाई ही सोनी मराठी वर प्रसारित होणारी मालिका निर्मित केली होती. जी मालिका लोकांच्या चांगलीच पसंतीस खरी उतरली होती.
पण त्याचसोबत प्रमुख अभिनेत्री यांच्यासोबत झालेल्या वादामुळे ही खूप चर्चेत होती. आता आपल्याला अंदाज आला असेलच की नेमकं कुणाबद्द्ल बोललं जात आहे. माहेरची साडी या चित्रपटातून मराठी मनावर तेव्हापासून आजपर्यंत न विसरता अविरतपणे राज्य करणारी अभिनेत्री अलका कुबल आठले. ( alka kubal athle )..
होय ! माहेरची साडी या एका चित्रपटाने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. सर्वांना सिनेमात खूप रडवले; पण त्याच सिनेमानी त्यांचं आयुष्य घडवलं. कारण सिनेमा व त्यातील सर्वच कलाकार फारच लोकप्रिय झाले होते. चित्रपट आजही आवर्जून पाहिला जातो. अभिनेत्री म्हणून जरी आज त्या जास्त प्रचलित असल्या तरी निर्मात्या म्हणून ही एकेकाळी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आजही त्यात त्या आघाडीवर आहेत. त्यांच्या नवऱ्याचे नाव आहे समीर आठले.
त्यांचं लव्ह म्यारेज झालेलं आहे. आज ते सुखी संपन्न जीवन जगत आहेत. पण अनेकांना त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात नेमकं काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असते. तर जाणून घेऊयात त्यांच्या कुटुंबा विषयी कारण त्यांची मुले आज नाव कमावत आहेत. कोणत्या क्षेत्रात तेच पाहूयात.
अलका कुबल आणि समीर आठल्ये या दोघांना दोन मुली आहेत. त्यांच्या दोन्हीही मुलींचे कस्तुरी व ईशानी अशी नावं आहेत. डॉक्टर चा मुलगा डॉक्टर तसा कलाकाराचा मुलगा कलाकारच असा जो इतिहासी पायंडा पडला आहे त्याला बदललं आहे या दोन प्रसिद्ध जोडप्यांच्या मुलींनी.
त्यांची एक मुलगी ईशानीने काही वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवलं होतं. कारण तिला तिथे जाऊन मनासारखे करायचं होतं. पण तिला पुन्हा भारतातही यायचं होतं म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आणि अखेर भारतातही लायसन्स मिळवलं.
आज ईशानी या मुलीने वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ अमेरिकेत मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. बघा, म्हणजे इंडस्ट्री मधील अनेक सेलिब्रिटी च्या मुला मुलींच्या पेक्षा जरा वेगळं करीयर निवडलेले आहे. ती लवकरच लग्न ही करणार आहे. दिल्लीच्या निशांत वालिया यांच्या सोबत. बरं धाकटी मुलगी पण काही कमी नाही. तीही परदेशात शिकायचं होतं. ती एमबीए करत आहे. तर अश्या त्यांच्या दोन्ही मुली आपल्या सर्वसामान्य भाषेत रांकीला लागलेल्या आहेत. इतरांच्या पेक्षा वेगळं काम करून. या परिवाराला त्यांच्या पुढील भावी वाटचाली साठी शुभेच्छा !..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.