5 स्टार हॉटेल पेक्षाही आलिशान आहे अल्लू अर्जुनची व्हॅनिटी वॅन, किंमत ऐकून थक्क व्हाल!

अल्लू अर्जुन हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित असेलच. नसायला काय झालं ? आपण त्याचे चित्रपट खूप आवर्जून पाहतो. दक्षिण चित्रपट सृष्टीमधील तो सध्याचा आघाडीचा सुपरस्टार आहे. आत्तापर्यंत त्याने खूप चित्रपट अभिनयातून साकारलेले आहेत. खूप सारे पुरस्कार सुद्धा त्याने त्याच्याच नावावर केलेले आहेत. यामध्ये फिल्मफेयर आणि नंदी अवार्ड हे प्रमुख पुरस्कार आहेत.

अल्लू अर्जुनच्या वडिलांचं नाव अल्लू अरविंद आहे. बाप दिग्दर्शक असले तर मुलगा खूप चांगला अभिनेता बनू शकतो याचं आपल्यासमोर अल्लू अर्जुनचं खूप प्रेरणादायी उदाहरण. त्याचे वडील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. इतकच नव्हे तर तेलगु इंडस्ट्री सुपरस्टार फेम चिरंजीवीचा भाचा आहे. घरदारच त्यांचं खूप मोठं आणि श्रीमंत आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच लहानपण एशो आरामातचं गेलेलं.

त्यानं फिल्म करियरची सुरुवात लालकृष्ण लाघ्वेंद्र राव दिग्दर्शित फिल्म गंगोत्री मधून केली होती. २००३ च्या दरम्यान रिलीज झालेली फिल्मने अल्लू अर्जुनला खूप यश दिलं. त्यानंतर त्याच्या अभिनयाची न पैसे कमवण्याची गाडी कधी थांबलीच नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्यात जास्त मानधन आज तो घेतो. लहानपणीपासूनच त्याचं सगळं जीवन श्रीमंतीत गेलं होतं. त्यामुळे जेव्हा तो कमवायला लागला तेव्हापासून तर अजूनच रिच लाइफस्टाइल जगायला त्यानं सुरुवात केली. आज करोडो रुपयांचा बंगल्याचा तो मालक आहे. सोबत व्यानिटी व्ह्यानची किंमत फाईव्हस्टार हॉटेल किमती पेक्षा जास्त आहे. त्याच्या आतली जागा तर स्वर्गाहून सुंदर ये. त्याची व्यानिटी व्ह्यान पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला तर नवल नव्हे. सगळ्या गोष्टींची सोय व्यवस्थितपणे केलेली आहे.

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनने आपल्या व्यानिटी व्ह्यान चे फोटो इन्स्टा ग्र्याम वर अपलोड केले होते. तेव्हापासून सर्वत्र फक्त त्याच्या गाडीची चं चर्चा रंगलेली आहे. बाहेरून आणि आतून तिची असलेली आकर्षकता पाहून अनेक जण व्ह्यानिटी व्ह्यान च्या प्रेमात पडलेले आहे. त्याच्या व्ह्यानिटी व्ह्यान मध्ये सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध आहे.

साधारणपणे ७ ते दहा करोड रुपयांपर्यंत त्याच्या व्ह्यानिटी व्ह्यान ची किंमत आहे. इतकी तर एखाद्या हॉटेलची सुद्धा लहान मोठ्या नसते. या पैश्यात एखादा व्यक्ती बंगला विकत घेतो. पण अल्लू अर्जुन शूटिंग व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी या व्ह्यान ला एवढे पैसे खर्च करतो. त्यानं खास एका कंपनीला व्ह्यान बनवण्याचं सांगून बनवून विकत घेतली आहे.

यासोबत अल्लू अर्जुनने स्वतःच्या नावाचा लोगो सुद्धा व्ह्यान वर बनवून घेतलेला आहे. तो AA चा लोगो सुद्धा खूप आकर्षित दिसतो. बॉलीवूड मध्ये शाहरुख खानची आणि दक्षिण मध्ये अल्लू अर्जुन दोघेही नेहमी आपल्या श्रीमंती जगण्याच्या चर्चेत असतात. याचं व्ह्यान मध्ये टीव्ही आणि मिटिंग करण्याची सुद्धा सोय आहे. अल्लू अर्जुन बाहेर शूटिंग दरम्यान भरपूर महत्वाच्या मिटिंग याचं व्ह्यान मध्ये करतो.

अल्लू अर्जुनच्या व्ह्यान ला बनवायला सहा महिने लागले. आतल्या इंटेरियर डीसाईन करायलाच त्याला ४ कोटी रुपये खरच करावे लागले. कारण व्ह्यान चा आतील भाग खूप आखीव पद्धतीने बनवलेला आहे. एखाद्या चांगल्या मोठ्या बंगल्याला सुद्धा लाजवील असा त्याचा आतील भाग आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या व्ह्यान ला फोल्कोन हे नावसुद्धा दिल्यालं आहे. स्वतःच्या घरापेक्षा ह्या व्ह्यान मधेच तो जास्त वेळ घालवतो. कारण सेल्फ वेगळं राहण्यासाठी यापेक्षा दुसरी जागा नव्हे असं तो म्हणतो.

तुम्हाला अल्लू अर्जुन बद्दल ही माहिती कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद !…

Leave a Comment