‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केवळ 19 व्या वर्षी खरेदी केली महागडी कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

गौरी कुलकर्णी हे नाव तुम्हाला आता चांगलच परिचयाचं झालं आहे. तुम्ही ह्या तुमच्या लाडक्या व सोज्वळ भाव असणाऱ्या अभिनेत्रीला दररोज झी युवावरील “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण” या मालिकेतून भेटत असता. तर ह्या अभिनेत्रीच्या आयुष्यात हळूहळू सर्वकाही चांगल्या गोष्टी घडायला एकदाची सुरूवात झाली आहे.

nikhil damle guari kulkarni zee yuva serial

गौरी वयाने सध्या केवळ 19 वर्षांची आहे आणि तिने चक्क आपल्या स्वत:च्या मालकी हक्काची कारदेखील खरेदी केली. ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही सत्यता आहे. 3 एप्रिल 2001 रोजी गौरीचा जन्म अहमदनगर येथे झाला. ती नृत्यकलेतील कथक शिकली आणि याच कलेच्या जोरावर तिने अनेक अवाॅर्डसही पटकावले.

सध्या ती मालिकेत काम करत असतानाच तिचं पदव्युत्तर शिक्षणदेखील पूर्ण करत आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने पहिलं पाऊल ठेवलं ते म्हणजे “रांजण” या 2017 सालच्या सिनेमातून. या सिनेमात गावाकडच्या पार्श्वभूमीवर आधारीत एक प्रेमकथा दाखवण्यात आली होती. प्रकाश पवार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

READ  वा'दातून खुलली होती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे अणि निखिल यांची प्रेमकथा, ऐकून थक्क व्हाल!

Almost Sufal Sampoorna actress Gauri Kulkarni

गौरी दिवसेंदिवस मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवत आहे. अशातच तिच्या गाजलेल्या मालिकेचे नुकतेच काही दिवसांपूर्वी 300 एपिसोडदेखील पार पडले. हा एक महत्वाचा यशस्वी टप्पा पार केल्यानंतरही मालिकेकडून प्रेक्षकांना अशाच प्रकारच्या आजवर चालत आलेल्या चांगल्याच कंटेंटची अपेक्षा आहे, सोबतच यातील इतर कलाकारांनीही आपली दर्जेदार कलाकृती सर्वांसमोर ठेवली आहे. अशा भन्नाट मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस उतरल्याने गौरीही फार आनंदी आहे.

गौरीने घेतलेल्या नव्या कारची चर्चा सर्वत्र रंगली आणि प्रत्येकाच्या तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्स व कमेंट्सही भरभरून येत राहिल्या. सिनेसृष्टीतल्या तेजस बर्वे, मालिकेतील सहकलाकार प्रिया मराठे इतरांनीही तिला कमेंट करून शुभेच्छा दिल्या. तेजसने तिला, आम्हाला तुझी कार कधी चालवायला मिळेल? असा सवालही केला आणि त्यावर, “लवकरच” अशा एका शब्दात उत्तर गौरीने दिलं.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केले ट्रॅडीशनल फोटोशुट, सगळीकडे रंगलीये तिच्या हिरव्या ड्रेसची चर्चा...

80481178

ही गाडी अर्थात कार खरेदी करणं हे गौरीचं स्वप्न होतं, या स्वप्नाची पूर्तता होताना अतिशय आनंद झाल्याचं गौरीच्या चेहऱ्यावरच दिसून येतं आहे. गौरीला या चांगल्या प्रसंगावर कुटूंब, नातलग, मित्रपरिवार सर्वांकडूनच अभिनंदनाची कौतुकाची थाप मिळत आहे. गौरी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीच्या भुमिकेत काम साकारत आहे.

मालिकेच्या कथानकाविषयी थोडक्यात म्हणालं तर, “नचिकेत” हा परदेशातून मुंबईमधे आलेला आणि सोबत एकीकडे मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली “सई” यांची साधी व एका धाग्यात गुंतलेली प्रेमकथा. या कथेची वरवर पाहता जशी सहजता दिसते तसेच याला आतून अनेक विविध पैलू आहेत.

gauri kulkarni

ज्यात समजतं की, वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले सई व नचिकेत हे दोघे कशा पद्धतीने एकमेकांशी मैत्रीच्या नात्यातून प्रेमाकडे आगेकूच करतात. खुप कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकायला सुरूवात केली होती. गौरीने कार घेतल्यानंतर तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता, असेच काहीसे चित्र दिसते.

READ  'देवमाणूस' मालिकेत 'मंजुळा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment