प्रसन्नसमोर उघड झालं सई आणि नचिकेतच्या प्रेमाचं सत्य…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी युवा मराठीवरच्या ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. यातच सई, नचिकेत आणि नचिकेतची थेट ऑस्ट्रेलियावरुन आलेली मैत्रीण कॅडी यांचा प्रेमाचा त्रिकोण बनणार नाही ना असे विचार करता करता प्रेक्षकांचा दमछाक होतेय.

आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. आता यातच नवीन ट्विस्ट मालिकेच्या क्रिएटीव्ह टिमने आणलंय हे ट्विस्ट आहे सईच्या वडिलांचं म्हणजेच प्रसन्नचं.

Advertisement

प्रसन्नला सई आणि नचिकेत यांच्या प्रेमाचं सत्य कळतं आणि मुलीची काळजी असलेल्या वडिलांप्रमाणे तो या प्रेमाला अप्पांपासून लपवून ठेवण्याच्या सई नचिकेतच्या कटामध्ये सामीलही होतो. अर्थात प्रसन्नची ही भूमिका इतक्या सहजासहजी मालिकेमध्ये पहायला मिळत नाही बरं. प्रसन्नला जेव्हा कळतं की सई आणि नचिकेतचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा सुरुवातीला तोही नाराज होतो. आणि या प्रेमाला विरोधही करतो. मात्र आजीच्या सांगण्यावरुन त्याची नाराजी काहीशी कमी होते आणि तोही नचिकेतला काही दिवसांची मुदत द्यायचे ठरवतो.

See also  या वृध्दाश्रमाने घेतले लहान अनाथ मुलांना दत्तक, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल!

प्रसन्न नचिकेतला आठ दिवसांची मुदत देतो ज्या दरम्यान त्याला अप्पांना त्याच्या आणि सईबद्दल सर्व काही सांगावं लागणारे. जर त्याने तसं नाही केलं तर नवव्या दिवशी तो स्वतः अप्पांना सत्य सांगणार असल्याचंही नचिकेत आणि सईसमोर स्पष्ट करतो. थोडक्यात आता नचिकेतला अप्पांसोबत प्रसन्नलाही प्रसन्न करायचं आव्हान मिळालंय आणि तेही काही मोजक्या दिवसांमध्ये.

Advertisement

नचिकेत हे आव्हान किती पेलतोय ते पहायचं. आणि त्यासाठी तुम्ही पहायला विसरु नका ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण ही मालिका फक्त झी युवावर.

Advertisement

Leave a Comment

close