विराट आणि अनुष्काने बद्दलली घराची नेमप्लेट, नवीन नेमप्लेट आहे खूपच विशेष, पाहून थक्क व्हाल!
विराट आणि अनुष्का ही बॉलिवूड मधील एक अशी जोडी आहे की ज्यांनी एकत्र आयुष्य घालवून आता एका मुलीला जन्म दिलेला आहे. आता तिचं नाव त्यांनी वामीका ठेवलेलं आहे. अश्यात त्यांच्या घराची नेमप्लेट बदलली आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की त्यांनी नेमकं कोणत्या नावाने नेम्पेल्ट केली असेल तर चला जाणून घेऊयात सविस्तर.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे पण ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. मुलीच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराटने मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
एकतर ते दोघे बाळाचा जन्म होण्याआधी खूप चर्चेत होते. तर आता त्यांना वामीका झालेली आहे. आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात खूप आनंद झालेला आहे.
दोघांनी मुलीचं नाव ‘वामिका’ ठेवल्याचंही चाहत्यांना सांगितलं. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांसमोर आणलेला नाही. परंतु, आता त्यांच्या मुलीबद्दल एक खास माहिती समोर येतेय.
अनुष्का ११ जानेवारीला आई झाली होती. गरोदरपणातील अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत होती. वामिकाच्या जन्मानंतर १ फेब्रुवारी रोजी अनुष्काने तिच्या मुलीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत मुलीच्या नावाची घोषणा केली होती. सोबत वामिका नावाचा अर्थही चाहत्यांना सांगितला होता. आता सोशल मीडियावर विराट अनुष्काच्या घराच्या नेमप्लेटची चर्चा रंगू लागलीये. परंतु, ही नेमप्लेट त्यांच्या घराबाहेरची नसून एका हॉटेल रूमच्या बाहेरील आहे.
जरी हॉटेल रूम बाहेरची असली तरी उद्या घरात लागली तर नवल नाही. कारण ती आता त्यांची मुलगी आहे. वामीका ही त्या दोघांच्या आयुष्यात खूप काही मोठा आनंद घेऊन आली आहे.
विराट सध्या इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या सीरिजमध्ये व्यग्र आहे. त्यात भारतीय खेळाडू ज्या हॉटेल मध्ये राहत आहेत, त्या हॉटेलने त्यांना त्यांच्या घरासारखं वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीबाहेर प्रत्येकाच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली आहे. विराटाच्याही खोलीबाहेर अशीच नेमप्लेट लावण्यात आली आहे. विशेषतः नेमप्लेटमध्ये विराट आणि अनुष्कासोबत त्यांची मुलगी वामिकाच्या नावाचादेखील समावेश आहे. त्यात वामिका, अनुष्का आणि विराट अशी तीन नावं लिहिण्यात आली आहेत. या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. ही विशेष नेमप्लेट चाहत्यांना प्रचंड पसंत पडली आहे.
बदलली गेलेली नेमप्लेट सध्या खुप व्हायरल होत आहे. चाहत्यांना ही आवडत आहे. तर त्या तिघांना आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.