अमिताभ बच्चन यांच्या त्या चुकीमुळे त्या दिवशी जाणार होती अनेकांची नोकरी, पण अभिषेकच्या…
बॉलिवूडचा ‘शहनशाह’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन लोकांना चूक न करण्याचा सल्ला देत राहतात, परंतु तुम्हाला माहिती आहे काय की त्यांच्या एका चुकी मुळे अनेक लोकांची नोकरी गेली असती, होय हि गोष्ट खरी आहे! अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 ला मुंबईत झाला. अभिषेक हा अमिताभ यांचा प्रचंड लाडका असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते.
एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे. ‘पा’ या चित्रपटात तर अभिषेकने चक्क अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अमिताभ आणि अभिषेक यांची केमिस्ट्री खूपच छान असून ती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते.
अमिताभ यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, अभिषेक बच्चन यांचा जन्म झाला तेव्हा, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना मुलगा असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी आनंदाने सर्व विसरले, त्यांना काय करायचे आणि काही नाही हेच कळत नव्हते.
त्यांनी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सगळ्यांना, त्यांच्या सगळ्या ड्रायव्हर्सना पैसे आणि मिठाई भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर अभिषेकचा ज्या रुग्णालयात जन्म झाला, त्याच आनंदात त्यांनी त्या डॉक्टरला आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या परिचारिका दारू पिऊ घातली.
अमिताभ यांनी सगळ्यांना वाईनची बॉटल भेट म्हणून दिली हे त्या रुग्णालयाच्या वरिष्ठांना कळल्यानंतर ते प्रचंड चिडले होते. कामावर असताना डॉक्टर, नर्स, वॉडबॉय यांनी दारू प्यायली असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा वरिष्ठांनी विचार केला होता.
अखेरीस ही गोष्ट अमिताभ यांना कळल्यानंतर त्यांनी त्यांची चूक मान्य केली आणि जाऊन वरिष्ठांची माफी मागितली होती. अमिताभ यांनी त्यावेळी हस्तक्षेप केला नसता तर त्या रुग्णालयातील अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली असती.
बिग बीनां आता हे समजले आहे की त्या दिवशी हॉस्पिटलचे नियम मोडायला नव्हते पाहिजे आणि असेही ते म्हणाले की कोणतेही नियम मोडणे हे चांगल्या नागरिकाचे लक्षण नाही.
अमिताभ आणि अभिषेक यांना चित्रपटात एकत्र पाहायला त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. त्यांच्या आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार याची ते नेहमीच आतुरतेने वाट पाहात असतात. ‘कजरा रे’ या गाण्यात तर प्रेक्षकांना अभिषेक, अमिताभ आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना एकत्र पाहायला मिळाले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.