अमिताभ बच्चन यांनी या अभिनेत्री सोबत रोमँटिक सीन दिल्यामुळे जया बच्चन यांना रडू कोसळलं !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज तसं पहायला किंवा म्हणायला गेलं तर नक्कीच अमिताभ बच्चन यांच नाव आलं आणि सोबतचं रेखाजींचा उल्लेख झाली नाही असं क्वचितच घडत असेल. अर्थातच याला कारणही खूप खास आहे ते म्हणजे, त्यांच बाॅलिवूडजगतात गाजलेलं प्रेमप्रकरण. अमिताभ बच्चन यांनी आपल्या स्वत:च्या अभिनय कौशल्यावर तसचं खूप अधिक प्रमाणात मेहनत करत स्वत:ला आज एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

amitabh

अमिताभ बच्चन यांचा करिअरचा सुरूवातीचा टप्पा अगदीच हालाखीचा राहिला हे फार क्वचित लोकांना माहीत असेल. त्यांच्या अनेक चित्रपट फ्लाॅपही झाले. परंतु हिम्मत मात्र त्यांनी हारली नाही. आपण पाहू शकतो की, आजही किती मोठ्या जोमाने अमिताभ बच्चन सिनेमांमधे नानाविध जाहीरातींमधे कार्य करतात. अर्थात बाॅलिवूडच्या एका टप्प्यात नक्कीच रेखा व अमिताभ ही जोडी फार गाजली. व अनेकदा त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या वावड्याही उठल्या गेल्या. अनेकांच्या मते, रेखाजी केवळ अमिताभ यांच्यामुळेच अविवाहित आहेत.

See also  हे होते लता मंगेशकर यांचे शेवटचे २ शब्द!

रेखाजींना थोडं ऊशीराच अमिताभ यांच्या लग्नाबद्दल समजलं होतं, पण जे झालं ते सोडा. सध्या एक गोष्ट आहे ती म्हणजे, चक्क अमिताभ आणि रेखा यांचा रोमॅन्टिक सिन पाहून जया बच्चन चक्क रडल्या होत्या. तर आता जरा ठळक किस्याबद्दल सांगतो.

rekha amitabh

बॉलिवूडच्या सिनेमासृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेलेत किंवा आत्ता आहेतही ज्यांनी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर काम करणार्‍या अभिनेत्रींनी थेट लग्न केले. यामधे प्रामुख्याने अमिताभ आणि जया बच्चन यांचाही समावेश होतोच. जया बच्चन, अमिताभ यांच्या आयुष्यात आल्यानंतरही अनेकदा रेखासोबत अमिताभचे नाव जोडल्या गेल्याचे पहायला मिळाले. बॉलिवूडच्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध प्रेमकथानकांपैकी रेखा व अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणीहीसुद्धा अफाट रंजक ठरली. मात्र त्याबद्दल कधीही अमिताभ अथवा रेखा यांनी उघडपणे बोलले नाही.

See also  "मूलगी झाली हो" कार्यक्रमात किरण माने यांची व्यक्तिरेखा साकारणार हा अभिनेता...

rekhajaya

त्यावेळी नुकतेच अमिताभचे लग्न झाले होते, पण अमिताभ आणि रेखाच्या प्रेमप्रकरणांच्या बातम्यांचीच अफवा व चर्चा अधिक रंगली होती. “मुकद्दर का सिकंदर” या चित्रपटात अमिताभ आणि रेखाचा एक रोमँटिक सीन होता आणि तो पाहिल्यानंतर त्यानंतर जया बच्चन यांना रडू कोसळलं होतं. या घटनेवरून अमिताभ यांनी एक मोठे पाऊल उचलल्याचेही म्हटले जाते. त्यावर सांगितलं जातं की, रोमॅन्टिक सिनचा खुलासा रेखाने स्वत: एका मुलाखतीत केला होता. सिन चालू असताना जया बच्चनवर रेखाची नजर पडली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळलेले स्पष्टपणे रेखाजींनी हेरले. त्यानंतर निर्मात्यांना अमिताभजींनी रेखासोबत इतर दुसरे प्रोजेक्ट करण्यास नकार दिला होता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment