अमिताभ बच्चन यांच्या भक्ताने बनवले अमिताभ यांचे मोठे मंदिर, दररोज ‘अमिताभ चालिसा’ वाचून करतो आरती, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कालच अमिताभ बच्चन 78 वर्षांचे झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील त्यांचा वाढदिवस कोलकाता येथील अमिताभ बच्चन यांच्या मंदिरात साजरा केला गेला. मात्र, यावेळी कोरोना साथीच्या आजारामुळे बिग बीचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला.

प्रत्येक वेळी यज्ञ आणि पूजेनंतर बच्चन धाम मंदिरात केक कापला जात असे. पण, यावेळी अमिताभच्या चाहत्यांनी अमिताभ चालीसा वाचून येथे एक हजार मास्क आणि तेच सॅनिटायझर मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. या शिवाय सुमारे २०० गरिबांना जीवनावश्यक किराणा सामुग्रीचे देखील वाटप झाले.

660446 amitabh mandir

कोलकात्यात अमिताभ यांना त्याचे चाहते गुरु म्हणतात. सन २००१ साली हे मंदिर बांधल्यापासून बिग बीचा वाढदिवस इथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी त्यांचे पूजनही केले जाते, परंतु यंदा को’रो’नामुळे मंदिरातील मुख्य सदस्यांनाच यात सामील होण्याची संधी मिळाली.

को’रो’नामुळे बाहेरील लोकांना उत्सवात सहभाग करण्याची परवानगी नव्हती. पूजे दरम्यान को’रो’ना निर्बंध आणि सामाजिक अंतर इ. लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता, असे मंदिराचे संस्थापक श्री.संजयजी पाटोदिया यांनी सांगितले. श्री. पाटोदिया म्हणाले की, “यावर्षी गुरुंचा वाढदिवस विशेष आहे, कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना व्हायरसवर यशस्वीपणे मात केली आहे.

See also  असा शूट केला होता राजा हिंदुस्थानी चित्रपटातला किसींग सीन ! सलग तीन दिवस दोघे..

श्री. पाटोदिया यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर सजविण्यात आले. केक देखील कापला. परंतु केवळ विशिष्ठ १०-१५ लोकच त्यात प्रत्यक्ष सामील होते. यानंतर सर्वांनी अमिताभ यांच्या मूर्तीला केकचा प्रसाद अर्पण केला. श्री. बच्चन यांच्या आई-वडिलांच्या पूजनानंतर सर्वांनी बिग बीं ची अमिताभ चालीसा आरती गायन करून पूजा केली.

null

अमिताभ यांचे हे मंदिर दक्षिण कोलकाता मधील श्रीधर राय रोडच्या बोंडेल गेट भागात आहे. या मंदिरात बिग बी आणि त्याच्या शूजची दररोज ६ मिनिटांची फिल्मी आरती गाऊन पूजा केली जाते. आरती आधी ९ पानांची खास अमिताभ चालीसा वाचली जाते. हे सर्व यथासांग झाल्यावर नैवद्य दाखवून बच्चन भक्तांना प्रसादही वाटप केला जातो.

तब्बल ७९ ओळींच्या या अमिताभ चालीसा मध्ये बिग बीं चे कार्य, संघर्ष इ. दोहा आणि चौपाई स्वरूपात लिहिलेले आहे. संजय पाटोदिया यांनी स्वतः ‘ओम श्री अमिताभ नमः’ या नावाने एक संकटमुक्त मंत्र तयार केला आहे.

See also  जेव्हा नागा चैतन्य म्हणाला होता, "मला समंथा सोडून दुसरी कोणीही नको" तेव्हा अभिनेत्रीने दिलं हे उत्तर...

बिग बी २ ऑगस्टला ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अ’प’घा’तातून बरे झाल्यानंतर सुखरूप घरी आल्यामुळे २ऑगस्ट ला त्यांचा दुसरा वाढदिवस म्हणून आम्ही साजरा करतो . असेही श्री. संजय पाटोदिया सांगतात.null

या मंदिरात, अग्निपथ या चित्रपटात बच्चन यांनी पायात घातलेल्या त्याच्या पांढऱ्या बुटांसह अमिताभच्या चित्र आणि प्रतिमेचीही पूजा केली जाते. इतकेच नाही तर ज्या खुर्चीवर ते अक्स चित्रपटात बसले होते ती देखील इथे आणली आहे. यावर दररोज अमिताभचा फोटो ठेवून पूजा-आरती केली जाते. अगदी परदेशातूनही बच्चन भक्त येथे येतात.

जेव्हा बिग बीं यांना या मंदिराबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी श्री. संजय पाटोदिया यांना पत्र लिहून म्हटले होते की – मी तुमच्या सारखाच एक हाडामांसाचा साधारण मनुष्य आहे आणि कृपया मला माणूस म्हणूनच राहुद्या, मला हे देवत्व आणि देवाचा दर्जा देऊ नका रे बाबानो…!

See also  पद्मश्री पुरस्कार प्राप्त बॉलीवूड सिंगरच्या मुलाने वडिलांवरच केला गंभीर आरोप, म्हणाला, "सहा महिन्यांच्या प्रेग्नंट पत्नीला..."

पण भारतातील “भक्त” हे काय असतात हे आपण रोजच पाहतो आणि अनुभवतोच आहोत… असो… जाता जाता इतकेच की, आम्ही हा लेख जे घडतेय, दिसतेय त्यावरच आणि वाचकांच्या महितीस्तव दिलाय. उगाच आम्हाला बोल लावण्यात काय हाशील? जे आहे ते असे आहे, तेंव्हा… वाचा आणि आनंद घ्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment