बच्चन हाऊसमध्ये झालेल्या त्या मिटींगनंतर पुन्हा कधीच अमिताभ – रेखा दिसले नाही एकत्र, नेमकं असं काय घडलं त्या मिटींगमध्ये…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक ब्युटीफूल लवस्टोरीज आहेत. त्यांपैकी बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची लवस्टोरी. या दोघांमध्ये काहीतरी खास तर होतेच, म्हणून तर त्या दोघांना जेव्हा एकमेकांविषयी प्रश्न विचारले जायचे, तेव्हा ते उत्तर देण्यास टाळायचे. म्हणून तर त्यांचे चाहते देखील यांची लव्हस्टोरी, ब्रेकअप यांविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
तर मित्रांनो नेमका या ब्युटीफूल कपलच्या लवस्टोरीचा अंत कसा बरं झाला, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. सौंदर्याची क्वीन अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चनजी यांची लवस्टोरी खूपच इंटरेस्टिंग होती. परंतु जेव्हा या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा जया बच्चन यांच्यासोबत अमिताभजींचे लग्न झाले होते.
मात्र एका चित्रपटाच्या दरम्यान रेखा व अमिताभ यांच्यातील जवळीक फारच वाढू लागली. एवढंच नव्हे तर या दोघांच्याही अफेयर्स च्या चर्चांनी देखील जोर धरला होता. मात्र त्यांची लवस्टोरी फार काळ टिकली नाही. खरंतर जया बच्चन यांनीच ती टिकवून दिली नाही, असे म्हटले तरी चालेल.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेयर्सच्या चर्चा सुरू असतानाच एक दिवस जया बच्चन यांनी रेखाला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. रेखाने सुद्धा मोठ्या हिंमतीने ते आमंत्रण स्वीकारून जया यांची भेट घेण्यासाठी घरी गेली. त्यादिवशी बच्चन हाऊसमध्ये जया आणि रेखा यांनी एकत्र ङिनर केलं. यादरम्यान त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
यामध्ये अमिताभ बच्चन यांचा देखील काहीप्रमाणात उल्लेख झाला. मात्र ङिनर झाल्यावर जेव्हा जया रेखाला दरवाजा पर्यंत सोडायला गेल्या, तेव्हा जया यांनी रेखाला चांगलाच उपदेश दिला. रेखाला निरोप देताना मी अमिताभला कधीच सोडणार नाही, असे जया बच्चन यांनी चांगलेच ठणकावून सांगितले. यावर रेखा थक्क झाली व तिला जे काही समजायचे, ते तिने समजून घेतले.
मात्र त्या दिवसानंतर रेखा आणि अमिताभ बच्चनजी यांची पुन्हा कधीच भेट झाली नाही. त्या दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होणे, पसंत केले. परंतु सोशल मीडियावर कित्येकदा रेखा आणि अमिताभ बच्चनजी यांच्या लवस्टोरीज वायरल झाल्या आहेत. मात्र यातील नेमकं खरं काय हे तर अजूनही कुणालाच समजले नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.