अरेच्चा! “बाहुबली” हा चित्रपट आता मराठीतून, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्यभूमिका…
“बाहुबली” या फुल टू जबरदस्त चित्रपटाने संपूर्ण देशभरात मनोरंजनाचा धिंगाणा घातला. प्रख्यात दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला आणि सुपरस्टार प्रभास च्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट. उत्कृष्ट कथा, जोमदार अभिनय आणि तितकीच जोमदार निर्मिती असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारा ठरला.
पण मित्रांनो हाच चित्रपट आता तुम्हांला तुमच्या मातृभाषेत पाहायला मिळाला, तर…. अर्थातच एक वेगळाच आनंद अनुभवता येईल. तर मित्रांनो आपली “शेमारू मराठीबाणा” ही लोकप्रिय वाहिनी तुमच्यासाठी हा सिनेमा आपल्या मायबोलीतून घेऊन आली आहे. उत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरङे यांनी मराठमोळ्या बाहुबली ची जबाबदारी स्वीकारली आहे. तर अभिनेते ङॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी बाहुबली मधील “बाहुबली’ या पात्राला आपला जोङ दिला आहे.
त्याचप्रमाणे देवसेनेनेचे पात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही साकारत आहे. उदय सबनीस, गश्मीर महाजनी, संस्कृती बालगुङे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी या चित्रपटाला परिपूर्ण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठमोळ्या बाहुबली चे लेखन स्नेहल तरङे यांनी केले आहे. तसेच मेघना एरंङे- शिवगामी, भल्लाल देव- गश्मीर महाजनी, कटप्पा- उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला अभिनेत्री संस्कृती बालगुङे हिचा आवाज असणार आहे.
कौशल इनामदार यांनी मराठमोळ्या बाहुबलीचे संगीत दिग्दर्शित केले असून त्याचे गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी आणि अस्मिता पांडे यांनी केले आहे. तर आता हा मराठमोळा “बाहुबली’ आपल्याला दीपावली च्या शुभ मुहूर्तावर पाहायला मिळेल. गुरुवारी 4 नोव्हेंबरला दुपारी 12.00 आणि सायंकाळी 7.00 यादरम्यान “शेमारू मराठीबाणा” या वाहिनीवर मराठी बाहुबली प्रेक्षकांसाठी प्रसारित होणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.