एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदारकीपर्यंत मजल मारणारे अमोल मिटकरी यांचा संघर्ष !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अगदी सर्वसामान्य घरात जन्म घेऊन देखील आपल्या कर्तुत्वाचा आणि वक्तृत्वाच्या बळावर मोठ्या राजकीय जबाबदारी पर्यंत पोचलेली अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. ही यादी महाराष्ट्रात खूप मोठी आहे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, विलासराव देशमुख,ई. मंडळींनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर दिल्लीपर्यंत मजल मारली. अमोल मिटकरींच नाव देखील भरपूर वर्षांनी याच लोकांमध्ये घेतलं जावं हीच अपेक्षा अनेक लोकांना आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद नियुक्त्यांमध्ये अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून गेलेले आहेत. त्यानिमित्ताने या लेखामध्ये आपण त्यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेऊयात….

amol mitkari1

सुरुवातीपासूनच संघर्ष करून अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राच्या वक्‍तृत्व चळवळीत आपली छाप सोडली आहे. एका सामान्य कार्यकर्त्यासाठी विधानपरिषदेचे आर्थिक गणित सांभाळणं ही फारच अवघड बाब असते परंतु तरीही पक्षाने दिलेली जबाबदारी मिटकरी यांनी निर्वविवाद पार पाडलेली आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माणूस मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनांच्या माध्यमातून गावोगावी फिरला, अनेक ठिकाणी त्यांच्या या कार्याला विरोध देखील झाला पण त्याला देखील न जुमानता अमोल मिटकरी यांनी आपलं काम चालू ठेवलं आणि त्यांनी केलेल्या कामाचे फळ म्हणून मा. शरद पवार साहेब यांनी त्यांना थेट विधानपरिषदेवर आमदार बनवल.

See also  वयाच्या ६५ व्या वर्षी लग्न करत आहेत देशातील प्रसिद्ध व सर्वात की मोठे वकील, होणारी पत्नी आहे...

amol mitkari2

एक सामान्य कार्यकर्ता प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा मित्र अशी स्वतःची ओळख अमोल मिटकरी यांनी तयार केले होती. हे नाव सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं ते मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव त्यांनी केलेल्या भाषणावरुन. पुढे ते संभाजी ब्रिगेड या संघटनेशी जोडले गेले आणि तिथे त्यांनी व्याख्यान द्यायला सुरुवात केली. पुढे काही दिवसांनी संभाजी ब्रिगेड मध्ये फुट पडली काहीजण समाजकारण करत तर काहीजण राजकारण करू लागली. आणि अशा परिस्थितीत अमोल मिटकरी यांनी राजकीय पक्षात प्रवेश केला. तिथे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि म्हणून त्यांना या राजकीय पक्षाचा त्याग करावा लागला पण तरीही त्यांनी समाजसेवेत मात्र खंड पडू दिला नाही.

amol mitkari3

राजकीय संभाजी ब्रिगेड मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सामाजिक संभाजी ब्रिगेड मध्ये परत काम चालू केलं. जेजुरी येथे 4 ऑगस्ट 2019 रोजी प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रवीण गायकवाड यांनी पवार साहेबांची साथ सोडून जाणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध केला आणि सर्वांना पवार साहेबांसोबत उभे राहण्याचे आदेश दिले. याच बैठकीत अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करावा हे देखील निश्चित करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस युवक समन्वयक अशा अनेक पदांवर ती अमोल मिटकरी यांनी काम केलं. बारामतीतील शरद व्याख्यानमालेतील त्यांचं भाषण पाहून किरण गुजर यांनी त्यांना आमदार करायचा निश्चय केला. तो शब्द आज राष्ट्रवादी काँग्रेसने आज खरा केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल दादा मिटकरी यांचे विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली.

See also  बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप

amol mitkari

अमोल मिटकरी आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवण्यासाठी संदेश होते आणि ती संधी त्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मिळाली. या यात्रांमध्ये अमोल मिटकरी यांनी भरपूर भाषण केली. आतापर्यंत व्याख्याने देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून समोर आले. शरद पवार यांनीदेखील अमोल मिटकरी यांना तेवढीच सोबत दिल्याचे सांगण्यात येते.

amol

अमोल मिटकरी यांनी कधी हेलिकॉप्टरमधून प्रवास केला नव्हता परंतु वक्तृत्व यामुळे त्यांना पक्षाने भरपूर संधी दिली आणि त्यांच्या दिमतीला एक हेलिकॉप्टर देखील देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात अमोल मिटकरी यांनी तब्बल 65 सभा घेतल्या. पुरोगामी महाराष्ट्रात पवार साहेबांना साथ द्या असं सांगत त्यांनी महाराष्ट्रात प्रबोधन केलं. आणि परिणाम स्वरूप महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. अमोल मिटकरी साहेबांचा यात सिंहाचा वाटा आहे.

See also  सुंदर अभिनेत्री गायिका आर्या आंबेकर बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदारकी इथपर्यंत मजल मारण्याची संधी खूप कमी जणांना मिळते आणि अमोल मिटकरी यांनी त्या संधीचं सोनं केलं.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment