अमीर खान आणि अमरीश पुरी यांनी कधीच केले नाही सोबत काम, कारण ‘या’ चित्रपटा दरम्यान अमरीश यांनी आमिरला…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दिवंगत अभिनेता अमरीश पुरी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी आहेत. मात्र ‘जबरदस्त’ या चित्रपटानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्याचं कटाक्षाने टाळलं.

मरीश पुरी यांनी ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक छोट्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण एका अभिनेत्यासोबत चित्रपट करण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही. तो म्हणजे आमिर खान. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. पण यामागचं कारण ऐकून तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल.

१९८५ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जबरदस्त’ या चित्रपटातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाले होते. या चित्रपटामध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता.

See also  कोट्यावधींची मालमत्ता असूनही हे बॉलिवूड कलाकार राहतात चक्क भाड्याच्या घरात, 3 नंबरची अभिनेत्री तर...

या चित्रपटातील एक सीन चित्रीत करत असताना अमरीश पुरी करत असलेलं काम आमिरच्या पसंतीत पडत नव्हतं. त्यामुळे याविषयी त्याने अमरीश यांना सांगितलं. परंतु त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. नंतर या दोघांनीही एकमेकांची माफी मागितली परंतु त्यानंतर हे दोघंही परत कधीच एकत्र दिसले नाहीत.

ही १९८५ मधील गोष्ट आहे. ‘जबरदस्त’ या चित्रपटाचं शुटिंग तेव्हा सुरु होतं. आमिर खानने तेव्हा अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली नव्हती. आपले काका आणि दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याकडे आमिर खान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. चित्रपटात संजीव कुमार, सनी देओल, राजीव कपूर, जया प्रदा आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते.

नासिर हुसेन दिग्दर्शित या चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण सुरु असताना आमिर अमरीश यांना काही सुचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमिरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु असं असताना सुद्धा आमिर त्यांना वारंवार सुचना करत होता.

See also  अरेच्चा! अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे नाक का'पून घेतले, नक्की काय बरं घडलं...

आमिरने लावलेला हा तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमिरच्या अंगावर जोरात ओरडले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी आमिरची माफीही मागितली. मात्र त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत कधीच एकत्र काम केलं नाही.

आपल्या संपूर्ण करिअरमध्ये त्याने कधीच अमरीश पुरी यांच्यासोबत काम केलं नाही. इतकंच नाही एखाद्या चित्रपटात अमरीश पुरी असतील तर तो चित्रपट करण्यास तो सरळ नकार द्यायचा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment