बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे निराश झालाय अमरीश पुरीचा नातू म्हणाला, “जर माझे आजोबा असते तर…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्या बॉलीवुडच्या मायानगरीत असे अनेक लोकप्रिय सितारे होऊन गेले. ज्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर स्वतःची एक वेगळीच छाप उमटवली. हे सितारे आज जरी या जगात नसले, तरीही त्यांच्या चित्रपटातील अभिनय पाहिले की ते अजूनही आपल्या सोबतच आहेत, असा भास होतो. कारण आपल्या अभिनयाला जीवंत ठेवण्याचे कौशल्य या सिताऱ्यांमध्ये होते. इंङस्टीमध्ये ज्याप्रमाणे चित्रपटात अभिनेत्याची भूमिका करणारा जसा प्रसिद्ध होतो. अगदी त्याचप्रमाणे खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता देखील चाहत्यांच्या मनात घर करतो.

असेच एक दिवंगत सुप्रसिद्ध स्टार अमरिश पुरी. ज्यांनी बॉलीवुडमधील अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या भूमिकांचे तर आजदेखील चाहते अफाट कौतुक करतात. परंतु हे देखील तितकेच खरे आहे की, अमरिश पुरी यांच्यासारखा स्टार बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पुन्हा निर्माण होणे, शक्य नाही.

See also  मराठी मालिकेमध्ये लोकप्रिय झालेल्या कलाकारांचं शिक्षण काय आहे! महितेय?

अमरिश पुरी यांच्या दमदार अभिनयाने इंङस्टीवर बराच कालावधी राज्य केले. त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कलेने तर त्यांना इंङस्टीमध्ये नाव मिळवून दिले. आपल्या करियरच्या कारकीर्दीत अमरिश पुरी यांनी एकापेक्षा एक सरस अशा सुपरङुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर देखील धूमाकळ घातला.

अमरिश पुरी यांच्या अभिनयात एवढी ताकद होती की लोक त्यांना चित्रपटात पाहूनच घाबरून जायचे. मात्र त्यांच्या सारखा अभिनय करणे, बॉलीवुडच्या नगरीत करणे, कुणालाही जमले नाही. अमरिश पुरी यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत नकारात्मक भूमिकांप्रमाणेच सकारात्मक भूमिका देखील साकारल्या आहेत. मात्र चाहत्यांना त्यांच्या नकारात्मक भूमिका जास्त प्रमाणात आवडायच्या. त्यामुळे स्वतः अमरिश पुरी यांनी देखील नकारात्मक भूमिका स्वीकारल्या.

अमरिश पुरी यांचे 12 जानेवारी 2005 ला कँसर सारख्या घातक आजाराने निधन झाले आणि इंङस्टी ने एक दमदार अभिनयाचा हिरा गमावला. अमरिश पुरी यांनी स्वतःच्या हिंमतीवर इंडस्ट्रीमध्ये आपली एक तुफानी ओळख बनवली होती, याचा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच अभिमान वाटतो.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे मुलं आहेत इतके शिकलेले, ही अभिनेत्री तर आहे फक्त १० वी पास...

अमरिश पुरी यांचा नातू वर्धन याने आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देत मुलाखतीमध्ये म्हटले की, मी इंङस्टीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करत आहे. त्याचप्रमाणे बॉलीवुडमध्ये चित्रपटांत काम मिळणे, हे सध्या खूप कठीण होऊन बसले आहे. त्याने आपल्या आजोबांची आठवण काढत म्हटले की, आता जर माझे आजोबा असते, तर ते इंङस्टीमधील चित्रपट निर्माते असते. मी त्यांच्याजवळ मला चित्रपटात घेण्यासाठी विनवणी केली असती. तसेच मी खूप चांगले काम करून दाखवले असते. परंतु आजोबा, आता आमच्यासोबत नाहीत, ही खूप वाईट गोष्ट आहे.

वर्धन हा आपले आजोबा अमरिश पुरी यांचा खूप लाडका होता. तो लहान असतानाच त्याचे आजोबा त्याला सोङून देवाघरी गेले. त्यामुळे वर्धनला आपल्या आजोबांची साथ जास्त कालावधी लाभली नाही. 2019 मध्ये वर्धन ने “ये साली आशिकी” या चित्रपटासाठी ङेब्यू केला होता. मात्र बॉक्सऑफिसवर त्याचा हा चित्रपट काही खास चालू शकला नाही.

See also  "मी जर प्रे'ग्नेंट राहिली, तर तू काय करशील", आपल्या मुलीच्या या प्रश्नावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिले हे उत्तर...

आपल्या मुलाखतीमध्ये वर्धन ने सांगितले की,”आपले आजोबा अमरिश पुरी यांच्यावर त्याला एक बायोपिक बनवायची आहे. यासाठी त्याने आपल्या फॅमिलीसोबत देखील बोलणे केले आहे व त्याच्या या निर्णयाने सर्वजण खुप खुश आहेत. वर्धन सध्या या बायोपिक चे प्लॅनिंग सुद्धा करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment