अमृता फडणवीस प्रकरणी, आरोह वेलणकर वर भ’ड’क’ले महेश टिळेकर, म्हणाले ‘तुझ्या बापाची मालकी…’

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या कधी काय होईल याचा भरवसा राहिलेला नाही. कारण आहे वा’द प्रतिवा’द जे की सोशल मीडिया त्याला खतपाणी घालायचा प्रयत्न करत आहे. मागे दिवाळीच्या काळात काय झालं होतं की अमृता फडणवीस ने एक गाणं गायलं होतं ज्यावर महेश टिळेकर यांनी खूप किळसवाणा आवाज आहे वगैरे अशी प्रतिक्रिया दिली होती.

ज्यावर सोशल मीडियावर अनेकांनी उत्तरे द्यायला सुरूवात केली. ज्यात एका तरुण मराठी अभिनेत्याने उडी घेतली. ज्यामुळे वाद खूपच वाढला. आणि महेश टिळेकर यांनी तर त्याला चोख असे प्रत्युत्तर दिलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय ? तो अभिनेता कोण ? चला तर मग पाहुयात.

Advertisement

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट दिग्दर्शक तसेच मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यावर टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देत अभिनेता आरोह वेलणकर याने देखील महेश टिळेकर यांच्यावर टीका करत, “महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली.

मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!?ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं.

See also  "कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही" अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद?
Advertisement

तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा…राहीला प्रश्ण मराठी तारकांचा,

तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!” आरोह वेलणकरच्या या टिकेवर महेश टिळेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की..

Advertisement

“Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.

कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना? का तिथे समाजसेवा करायला गेला होतास?ज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास?

See also  या मराठमोळ्या अभिनेत्रीने उचलले पाऊल, तिच्या या कार्याला कराल तुम्हीपण सलाम, जाणून घ्या तिच्या कार्याची गाथा...
Advertisement

ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का? जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का?

तेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे?कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे.

Advertisement

आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.यावरून आपल्या लक्षात येत आहे की महेश टिळेकर हे खूप संतापलेलेले आहेत. त्यांच्या रागाचा पारा फार वर चढलेला आहे. पुढे काय म्हणाले तेही पाहुयात.

आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास का?जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयवा मधून बाहेर येत आहे ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल…. असं राग आलेलं उत्तर महेश टिळेकर यांनी दिलेलं आहे.

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...
Advertisement

म्हणजे बघा कशाची ठिणगी कुठं पडेल हे सांगणे अवघड. तर असं आहे आरोह आणि महेश टिळेकर यांच्या वादाचं प्रकरण. जे की सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात आरोह वेलणकर ट्रोल होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close