बाळाला स्तनपान करतानाचा या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल…
सोशल मीडियावर सिनेसृष्टीतलं कधी काय व्हायरल होईल हे काहीच सांगता येणार नाही. सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्री च सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ती आपल्या बाळाला स्त’न’पा’न करत आहे. आता एक आई बाळाला स्त’न’पा’न करते ते काही नवं नाही: पण एक अभिनेत्री करते आणि सोशल मीडियावर व्हायरल होते तेव्हा चर्चेत येणारच. नेमकं कोणती आहे अभिनेत्री चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती ल सोआर जे अनमोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमृतानं मागच्या वर्षीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. हे दोघंही अनेकदा आपल्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर करत असतात. आता आर जे अनमोलनं अमृताचा बाळाला ब्रे’स्ट’फी’ड करतानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
अभिनेत्री अमृता रावनं २०१६ मध्ये आर जे अनमोलशी लग्न केलं होतं. आता या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. अनेकदा हे दोघंही त्यांच्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच अमृतानं आर जे अनमोलचा मुलगा वीरसोबतचा एका व्हिडीओ शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अनमोलनं अमृताचा बाळाला ब्रे’स्ट’फी’ड करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यासोबत एक सुंदर पोस्ट सुद्धा लिहिली आहे.
आता तिच्यासाठी हे एका आईची भावना आहे पण चाहत्यांना मात्र अश्या गोष्टी नवीन असतात. ते या विचारापर्यंत येऊन पोचलेले नसतात. त्यामुळे ते अस होते.
मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमृता राव आणि आर जे अनमोल आई-बाबा झाले आहेत. त्यानंतर ते आपल्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अमृता आणि अनमोल यांनी आपल्या बाळासाठी नॅनी ठेवलेली नाही. ते दोघं मिळून त्याची काळजी घेतात. अशात आता अनमोलनं सोशल मीडियावर शेअर केलेला अमृताचा फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो शेअर करताना अनमोलनं हा फोटो खरा आणि जादुई असल्याचं म्हटलं आहे. या फोटोमध्ये अमृता व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे. पाठमोऱ्या बसलेल्या अमृताच्या कुशीत तिचा मुलगा आहे.
आर जे अनमोलनं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘वीरला दूध पाजणाऱ्या अमृताला पाहणं माझी आवडती गोष्ट आहे. हे खूपच वेगळं पण तेवढंच जादुई सुद्धा आहे आणि खूप पवित्र सुद्धा. हे खूपच कठीण काम आहे. पूर्ण रात्र, पूर्ण दिवस, आणि असं करताना तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. आई आणि मुलाचा मी खूपच सुंदर बॉन्ड पाहिला आहे. तुला मी सॅल्यूट करतो. मी माझ्या आईला सॅल्यूट करतो आणि या जगात असलेल्या सर्व आईंना सुद्धा. यासाठी मदर्स डेची वाट का पाहावी.’
आई म्हणजे बाळासाठी जगण्याचं विद्यापीठ असतं. ती भावना निर्मळ पणे तिने सोशल मीडियावर व्यक्त केली पण ती वेगळ्याच अर्थाने सोशल खूप व्हायरल झाली.
आर जे अनमोलची ही सुंदर पोस्ट आणि त्याचे विचार याचं सर्वच चाहते कौतुक करताना दिसत आहेत. अनमोलच्या अगोदर अमृतानंही काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तो आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये अनमोल वीरला मालिश करताना, त्याला अंघोळ घालताना आणि झोपवताना दिसला होता.
दोघांना आपल्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून. असेच आनंदी रहा. सुखी समाधानाने जगा. लोक काय म्हणतील हे चालूच असतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.