अनन्या पांडे पुन्हा चर्चेत…ब्रेकअप नंतर आता ती करतेय या अभिनेत्याला डेट…जाणुन घ्या कोण तो ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे खूपसे फोटो पाहायला मिळतात, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे चाहते मंडळी देखील तिची सतत चर्चा रंगवून असतात. तिचा आगामी चित्रपट “लाईगर” मध्ये ती विजय देवरकोंडा सोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, हा प्रोमो भरपूर लोकप्रिय झाला आहे. यातून या चित्रपटाच्या कथानकाची प्रेक्षकांना विशेष उत्सुकता लागली आहे.

अनन्या तिच्या प्रोफेशनला घेऊन खूप लक्ष वेधून घेत असते, सोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे ती तिच्या प्रेमकहाणी मुळे चर्चेत येत असते. शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर याला गेली बरेच दिवस अनन्या डेट करत होती. सोशल मीडियावर व बॉलिवूड मध्ये सर्वत्र त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकांना त्यांच्या नात्याबद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता लागली होती. खूपशा कार्यक्रमात या दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. त्यांची एकत्र जोडी अनेकांना आवडत होती.

See also  कतरिना- विक्की यांना लग्नात मिळेल करोडोंचे गिफ्ट, पहा रणबीर आणि सलमान खान काय दिलेत गिफ्ट्स...

मात्र या जोडप्याचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे, त्यामुळे तिच्या सोबत तिचे चाहते सुद्धा नाराज झाले होते. पण लवकरच ती पुन्हा विशेष चर्चेत आली असून ती आता नवीन साथीदाराला शोधत असून तिचा शोध पूर्ण झाला आहे. सर्वांचा लाडका आणि लोकप्रिय अभिनेता हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला अनन्या डेट करत आहे. अभिनेत्री अनन्याने करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ द इयर २” चित्रपटातून २०१९ साली बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. फार कमी वेळात तिने भरपूर नाव कमावले आहे.

तिची बॉलिवूड मध्ये एक विशेष ओळख बनली आहे, दरम्यान तिच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी समोर येत असून मलंग फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरला अनन्या डेट करत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत, सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा आहे की त्या दोघांनी आपले नाते लपवून ठेवले आहे. अभिनेत्रीचे नाव आदित्य आधी अनेक अभिनेत्यांशी जोडण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्स नुसार अभिनेता ईशानच्या आधी अनन्या करण जय सिंहला डेट करत होती. ईशान आणि अनन्याची भेट “खली-पिलीच्या” सेटवर झाली होती.

See also  अभिनेता शाहरुख खानच्या फॅनने बनवले त्याचे अप्रतिम पेंटींग, पेंटिंगची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

अगदी तीन वर्षे या दोघांनी एकमेकांना डेट केले होते, मात्र आता त्यांनी ब्रेकअप करून आपल्या नात्याला थांबवले आहे. त्यामुळे आता चर्चा सुरू आहे की अनन्या आदित्यला डेट करत आहे, पण याबाबत अजूनही ठोस माहिती समोर आलेली नाही. अनन्याला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment