अनिल कपूर यांच्या “या” मूलीचे झाले अगदी गुपचूप ‘लग्न’, यामागील कारण ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल…
हल्ली कोरोना वायरसमुळे व लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभरात कित्येक कठीण नियम लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे नियम पाळता कोणत्याही कारणाने गर्दी करणे यास सक्त मनाई आहे. त्यामुळे लग्न समारंभ व इतर अन्य कार्यक्रम यांना मर्यादित लोकांची उपस्थिती देण्यात आली आहे. याच कारणामुळे अनेक लग्नसोहळे हे अगदी कमी स्वरूपात होत आहेत.
नुकतेच बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता अनिल कपूर व त्यांची मूलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिची बहीण रिया कपूर हिच्या विवाहाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. मागील शनिवारी रिया कपूरने आपला लाँगटाइम बॉयफ्रेंड करण बुलानी याच्यासोबत एका साध्या- सरळ, छोटेखानी समारंभात विवाह केला. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हा विवाह सोहळा पार पाडला.
नेहमी बॉलीवुड स्टार्स च्या लग्नात दिसणारी चकाचौंध, स्टार्सची गर्दी, आलिशान रोशनाई आणि चमक या सोहळ्यात दिसून आली नाही. कारण कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवता कपूर कुटुंबीयांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यामुळे त्यांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
त्याचे कारण म्हणजे या लग्नाची तयारी ही अतिशय साधेपणाने केली गेली होती. लग्नाआधी कुणालाही त्याविषयी कल्पना दिली नव्हती. तसेच कपूर कुटुंबीयांनी कुठेच लग्नाचा उल्लेख देखील केला नव्हता. मीडिया व फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांना आदल्या दिवशी रात्री माहिती मिळाली व त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटोज् सुद्धा वायरल झाले होते.
परंतु एक विशेष गोष्ट म्हणजे या लग्नानंतर कपूर कुटुंबीयांनी आपल्या बॉलीवुड मधील सर्व आप्तेष्टांना व मित्र- मंङळीना लग्नाला न बोलावण्याचे कारण स्पष्टपणे उघड केले. अत्यंत भावनिक शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली व त्याचबरोबर सर्वांसोबत हा आनंद व्यक्त करण्याची आपण प्रतिक्षा करत आहोत, असा देखील त्यात उल्लेख केला. याच एकमेव कारणामुळे अभिनेते अनिल कपूर यांच्या या कार्याचे सर्वत्र प्रचंड कौतुक होत आहे.
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आएशा श्रॉफ हिने इन्स्टाग्रामवर आपल्या सर्व चाहत्यांसोबत या कार्ङची एक झलक शेयर केली. हा फोटो शेयर करत तिने रिया- किरण यांना आशीर्वाद दिला आहे. तसेच या कार्ड मध्ये असे लिहिले आहे की, “14- 8- 2021 रोजी करण व रिया यांचा विवाह एका लहान समारंभात करण्यात आला, हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
सद्यस्थितीमुळे आम्हांला आमच्या कित्येक प्रियजनांना या लग्नात आमंत्रित करता आलेच नाही. त्यामुळे आम्हांला तुमची खूप कमी जाणवली, परंतु तुम्ही सर्वजण आमच्या हृदयात आहात. रिया आणि करण यांनी स्वतःचे एक स्वतंत्र आयुष्य सुरू केले आहे, त्यांना तुमचे भरपूर आशिर्वाद व प्रेम मिळावे अशी आम्ही आशा व्यक्त करतो. लवकरच ही परिस्थिती सुरळित झाली की आपण हा सर्व आनंद एकजुटीने साजरा करू.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.