बॉलीवूडमधील हॉरर फिल्मचे सर्वात खतरनाक भूत ‘सामरी’ ज्याला पाहिल्यावर लोक भीत असे, आज जगत आहेत असे जीवन…
बॉलिवूड चित्रपट इंडस्ट्री मध्ये एक काळ असा होता की, तिथे एकामागून एक अनेक हॉरर चित्रपट प्रदर्शित हिट होते. जणूकाही तो काळ म्हणजे हॉरर चित्रपटांचा सुवर्णकाळाच होता. त्यात सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे निर्माते, निर्देशक रामसे बंधू. ते म्हणजे या हॉरर चित्रपटांचे बादशहाच होते. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक प्रचंड घाबरायचे. आज इतक्या वर्षांनंतरही त्या काळच्या प्रेक्षकांमध्ये रामसे बंधूंच्या चित्रपटातील भयकथांच्या आठवणी चवीने चघळल्या जातात.
या खतरनाक चित्रपटातील एक सर्वात भीतीदायक पात्र होते यातील एक पात्र म्हणजे “सामरी” नावाचे महाभयानक भूत. जे पडद्यावर साकारले होते अनिरुद्ध अगरवाल यांनी. या अनिरुद्ध अगरवाल यांनी रामसे बंधूंच्या केवळ तीन सुप्रसिद्ध चित्रपटांत काम केले, परंतु त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याकाळी ते बॉलीवूड हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक हॉरर अभिनेते ठरले.
इतके की लोक खरोखरच त्यांना “सामरी” म्हणून घाबरायचे. तसे म्हणाल तर अनिरुद्ध अग्रवाल यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांना कोणतीही चित्रपट विषयक पार्श्वभूमी नव्हती. त्याकाळी म्हणजे १९७४ साली ते उच्चशिक्षित होते. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण करुन आणि त्यानंतर ते चांगली नोकरी सुद्धा करत होते.
पण त्यांना अभिनयाची मात्र खूप आवड होती. आणि शेवटी हा छंदच त्यांना बॉलिवूडमध्ये घेऊन आला आणि आपली आवड आणि मेहनत यांची सुयोग्य सांगड घालत ते हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात हॉरर व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते बनले.
किस्सा असा आहे की, एकदा अनिरुद्धने आजारपणामुळे त्यांच्या कार्यालयातून रजा घेतली. रजेवर आराम करत असतांना त्यांची चित्रपट विषयक आवड लक्षात येऊन त्यांना भेटायला आलेल्या ऑफिस मधील एका मित्राने त्यांना रामसे बंधूंना भेटायला सांगितले.
बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत अनिरुद्ध अगरवाल म्हणाले होते की, ‘जेव्हा रामसे बंधूंनी मला पहिल्याच भेटीत “पुराना मंदीर” सारखी फिल्म ऑफर केली, तेव्हाच मी माझी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. कारण मला अभिनेताच व्हायचे होते आणि हीच माझी संधी होती जी माझ्यासाठी दारात उभी होती. त्यामुळे मी रिस्क घेतली. मला माझ्या क्षमतेवर विश्वास होताच. आणि यापुढेही मला अधिक संधी मिळतील असं त्यावेळी वाटलं आणि लगेच निर्णय घेऊन मी माझे करिअर बदलले.
अनिरुद्धची शरीरयष्टीच अशी होती की ते अशा भयानक, भीतीदायक व्यक्तिरेखेत चपखलपणे फिट बसत होते. यासाठी त्यांना जास्तमेहनत किंवा मेकअप करण्याचीही गरज नव्हती. प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी त्यांचा भेदक, धोकेदायक चेहरा, डोळे असा गेटअपच पुरेसा होता. रामसे बंधूंनी हे अचूक ओळखले आणि नंतर त्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये संधी दिली.
अनिरुद्धने रामसे बंधूंसोबत एकामागून एक असे तीन चित्रपट केले. पुराना मंदीर सुपरहिट झाला. आणि लोकांना आता सामरीची भीती वाटू लागली. यानंतर अनिरुद्ध १९९० मध्ये रामसे बंधूच्या ‘बंद दरवाजा’ या चित्रपटात दिसले. या चित्रपटानेही तगडी कमाई केली. अनिरुद्धने द जंगल बुक (१९९४) आणि अशा लाँग जर्नी (१९९८) या सारख्या हॉलिवूड चित्रपटात देखील काम केले.
मात्र, काही काळानंतर जेव्हा बॉलिवूडमधील भयपट चित्रपटांचा सुवर्णकाळ संपला. त्यानंतर हळूहळू अनिरुद्धलाही ऑफर्स मिळणे बंद झाले. नंतर अनिरुद्ध अगरवाल पुन्हा एकदा आपल्या सिव्हील इंजिनिअरिंगच्या व्यवसायात परतले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.