‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार या नव्या शो मध्ये, शो चे नाव ऐकून थक्क व्हाल!

झी मराठी वाहिनीवर एक मालिका खूप लोकप्रिय झाली होती. त्या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रसिद्ध होण्याच्या शिखरावर आहे. राधिका, गुरू नाथ अश्या सगळ्याच व्यक्ती रेखा गाजलेल्या आहेत. आता आपल्या लक्षात आलं असेल की कोणत्या मालिके बद्दल बोलत आहोत. माझ्या नवऱ्याची बायको.

anita date

जी मालिका खूप वर्षं चालू राहिली कारण प्रेक्षकांना ती खूप आवडायची. त्यातील ट्विस्ट आणि टर्न चाहत्यांना भावायचा. आता त्यात काम करणारी राधिका आपल्याला माहीत असणारच.

त्या अभिनेत्री चं खऱ्या आयुष्यात नाव आहे अनिता दाते केळकर. हो जी आता चाहत्यांना एक नवीन खूषखबर घेऊन आलेली आहे. ती एका नव्या टेलिव्हिजन शो मध्ये काम करणार आहे. झी मध्येच. तर चला मग जाणून घेऊ सविस्तर.

See also  'पाहिले न मी तुला' या मालिकेतील प्रमुख अभिनेता आशय कुलकर्णी या कारणांमुळे झाला होता गायब!

MV5BZDI0NGZmOWMtYTdjMS00NWQwLWJiMjctMTgwYzVmZTFlMzNkXkEyXkFqcGdeQXVyMjQ2MDI5ODE@. V1

माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील राधिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

या भूमिकेत आपल्याला अनिता दातेला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. ही मालिका संपल्यानंतर तुमची लाडकी अनिता आता काय करतेय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

66457234

अनिता दातेच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. ती आता लवकरच छोट्या पडद्यावर परतत असून झी मराठीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात झळकणार आहे. अनिता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात झळकणार असून तिचे एक वेगळे रूप तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

अनिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओत आपल्याला गायत्री दातारसोबत तिला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या तालमीच्या वेळेसचा आहे.

See also  एकेकाळी दारोदारी जाऊन साड्या विकल्या, आज आहे मराठी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

Anita Date

चला हवा येऊ द्या’ मध्ये भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपूरे, अंकूर वाढवे यांच्या व्यतिरिक्त आजवर शिवानी बावकर, गायत्री दातार, स्नेहा शिदम या अभिनेत्री विनोद करताना दिसल्या आहेत.

अनिता दाते आता तिथेही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवेल यात काहीच शंका नाहीये. आणि तिच्या चाहत्यांना ही एक नवी पर्वणी असणार आहे हेही खूप बेस्टच काम आहे. तर अनिता दाते यांना या शो साठी आणि पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a Comment

close