अंजली भाभींनी या ध’क्कादायक कारणांमुळे सोडला ‘तारक मेहता…’ शो, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
“तारक मेहता का उलटा चश्मा” ह्या मालिकेला आज तमाम जगभरात प्रसिद्धी आहे. ह्या मालिकेतले एकूण एक कलाकार आणि यातली एकूण एक कलाकृती लोकांना निखळ हास्याच्या आनंदासोबतच आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जाते. महत्त्वाची बाब म्हणजे, नुकतचं या जबरदस्त मालिकेने ३ हजार भागांना भरपूर मोठा टप्पा ओलांडला आहे.
आजच्या माडर्न आणि नव्या वेशभूषेत शुट होणाऱ्या इतर एखाद्या कोणत्याही मालिकांपेक्षा सरस आणि अख्या कुटुंबासोबत आपण ह्या मालिकेला पाहू शकतो; ही खासियत बाळगत ह्या मालिकेने आजवर आपल मनोरंजन केलं आहे. आता मुद्या तुम्हाला याच मालिकेतल्या खास पात्राशी निगडित असलेला समजला असेल. तर हे पात्र म्हणजे, “अंजली भाभी”.
ज्या मालिकेतील दस्तुरखुद्द तारक मेहता यांच्या पत्नीच्या भुमिकेत आहेत. तारक मेहता यांची भुमिका शैलेश लोढा करतात, जे की स्वत:च उत्कृष्ट लेखकदेखील आहेत. परंतु काही कारणास्तव अंजली भाभींची भुमिका करणाऱ्या नेहा मेहताने हा शो मागे सोडला.
त्याच कारण त्यांनी लगोलग स्पष्ट केल नव्हतचं परंतु आता त्यांनी ते सांगितलं आहे. नेहा मेहतादेखील आधी चांगल्याच प्रकारे कलाक्षेत्राशी निगडीत होती. जेठालाल, तारक मेहता, बापूजी पासून ते सर्वच कलाकार आज सामान्यांच्या ह्रदयावर राज्य करतात.
अशात अंजली भाभींची भुमिका करणारी अभिनेत्री नेहा मेहतांची प्रसिद्धीही तितकिच लोकप्रिय असतानाही त्यांनी मालिका का सोडली हा प्रश्न समोर होता? पण आता नेहा मेहता त्यावर व्यक्त झाली आहे, आपण नेमकं कारण जाणून घेऊयात.
नेहा मेहता या अभिनेत्रीने सांगितले की तिला अभिनयात साचात न राहता इतरही भुमिका आजमावून पहायच्या होत्या जे की मालिकेच्या बिझी शेड्युलमधे राहून करण्यात अडथळा येऊ लागला होता. तर नेहाने मालिका सोडल्यापासून आता अंजली भाभींची जागा ही सुनना फौजदार या अभिनेत्रीने घेतली आहे.
नेहा मेहताने सांगितले की, मालिका सोडल्यानंतर तिला तिच्यातल्या इतर क्षमतांचाही परिचय झाला. मुळात नुकतच तिने गुजराती सिनेमादेखील केला, नारी शक्ती अर्थात स्त्रीवर आधारित असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहाला मोठ्या पडद्यावर काम करत राहण्याची आता ईच्छा आहे, आणि त्याकडे ती वाटचाल करत आहे. नेहा म्हणते, देवावर मला पूर्ण विश्वास आहे. शिवाय असित मोदी जे की तारक मेहता मालिकेचे निर्माते आहेत त्यांचा मी मान राखते.
कधीकधी तुमचं शांत राहणं अनेक प्रश्नांच उत्तर देऊन जातं, असंही तिने स्पष्ट सांगितलं. नेहा म्हणते की, मला माझ्यावर विश्वास आहे तेव्हा मी माझ्या प्रेक्षकांना, फॅन्सना एक भुमिका न दाखवता आता विविध भुमिकांमधून त्यांच्या समोर आली पाहिजे. मला इथून पुढे आणखी चांगल्या कामांची पूर्तता करायची आहे.
आणि तिच्या म्हणण्यानुसार, कधीकधी एखादा शेवट नव्या सुरूवातीसाठी नेहमीच चांगला असतो. सध्या नेहाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिला अनेक शोजच्या ऑफर आल्या आहेत. परंतु ते पसंत न पडल्याने तिने त्यांना नकार दिला आहे. आता मुळात नेहाने मन बनवलंच आहे की, काम करायचं तर दर्जेदार आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच मनोरंजन करायचं. तर तिच्या ह्या नव्या वाटचालीसाठी लाखो शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!