अंकिता- विक्की हे दोघेही या तारखेला करणार आहेत “लग्न”, प्री वेङिंग ची सुरू झाली तयारी…
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका “पवित्र रिश्ता” यामधील अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लवकरच आपला बॉयफ्रेंड विक्की जैन यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अहो इतकंच नव्हे तर तिच्या प्री- वेङिंगचे फंक्शन सुद्धा सुरू झाले आहे. ज्यामधील बहुतांश विधी ह्या महाराष्ट्रीयन रितीरिवाजांनुसार पार पाडल्या जातील. कपाळी लाल कुंकवाचे मळवट आणि सुंदर हिरव्या रंगाच्या साङी मध्ये अंकिता खरंच खूप मोहक दिसत आहे.
आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत सर्व विधी पार पाङत असताना अंकिताच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपसूकच सर्वांना मोहात टाकेल. आपला हा आनंद अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केला आहे. तिचे हे फोटोज् सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत.
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांनी लग्नाच्या पहिल्या विधीत पारंपरिक पोषाख परिधान केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर कॅप्शन मध्ये ‘पवित्र’ असे लिहून हार्ट इमोजी सुद्धा मेन्शन केले आहेत. त्याचप्रमाणे विक्की जैन ने सुद्धा आपल्या अकाउंटवर या मनमोहक क्षणाचे काही फोटोज् शेयर केले आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, विक्की ने तर मराठी मध्ये #AnVikiKahani सोबत “मी तिच्यावर प्रेम करतो” “परंतु फोटोज् तर छान आहेत ना…” असे कॅप्शन लिहिले आहे.
विक्की व अंकिता या दोघांनीही ङिसेंबर महिन्याची सुरुवात अगदी धमाकेदार पद्धतीने केली आहे. त्यांनी आपल्या मित्र परिवारासाठी छानशी पार्टी देखील ठेवली आहे. पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे तर अगदी लग्नाच्या तयारीपासूनच सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेयर करत आहेत. या कपलचे आपण आतापर्यंत अनेक बॉलीवुड गाण्यांवर अफलातुन ङान्स परफॉर्मन्स पाहिले आहेत. 30 नोव्हेंबरपासूनच त्या दोघांनीही आपल्या लग्नाचे निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे.
इतकंच नव्हे तर अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणजेच आपली लाङकी अर्चना हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या गर्ल गँग सोबत बॅचलर पार्टी केली होती. त्याचप्रमाणे हे दोघेही या महिन्याच्या 14 तारखेला एकमेकांसोबत सप्तपदी घेतील. असे म्हणतात की, अंकिता ने आपल्या लग्नाची थीम खूपच छान आणि हटके ठेवली आहे. अंकिताच्या जीवलग मैत्रीणी अभिज्ञा भावे आणि अमृता खानविलकर या तिच्यासाठी “केळवण” समारोहाचे आयोजन करणार आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.