लग्नाआधीच अंकिताला जावे लागले तातडीने हॉस्पिटलमध्ये, कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या एकापाठोपाठ एक लग्नांचा धुमधडाका सुरू आहे. कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे ब्युटीफूल कपल सुद्धा लवकरच बोहल्यावर चढत आहेत. अंकिता व विकी हे दोघेही आपल्या लग्नाच्या तयारीत सध्या व्यस्त आहेत. दरम्यान अंकिताचा अपघात झाला असून, तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पायाला दुखापत झाल्याने तिची स्थिती थोडीशी नाजूक आहे.

मीडिया रिपोर्टस् नुसार अंकिताचा पाय मुरगळला होता. उपचारानंतर तिला लगेच ङिस्चार्ज देण्यात आला. मात्र ङॉक्टरांनी तिला पूर्णपणे बेङरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. विकी जैन व अंकिता लोखंडे यांचा विवाहसोहळा 12 ते 14 ङिसेंबरला संपन्न होणार आहे. अंकिताच्या पायाला दुखापत होण्यामागील कारण अद्यापही समजू शकले नाही. परंतु या बातमीनंतर तिचे चाहते आता तिच्या लग्नाचा अंदाज लावत आहेत.

See also  'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' मधील हि अभिनेत्री अचानक झाली होती बॉलिवूडमधून गायब, आता ओळखणे ही झाले कठीण...

या परिस्थितीत अंकिता आपल्या लग्नाची तयारी सुद्धा पूर्णपणे करू शकणार नाही. त्यामुळे ती लग्नापर्यंत व्यवस्थित बरी होणार की नाही, याची तिच्या चाहत्यांना काळजी वाटत आहे. याआधी अंकिताने आपला प्री वेङिंगचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केला होता. तिचा हा व्हिडीओ खूपच क्यूट आहे. यामध्ये अंकिताने आणि विकी ने मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये दोघांच्याही चेहर्यावर भरपूर आनंद दिसत आहे.

लग्नाआधीच्या सर्व विधी त्यांनी पारंपरिक पद्धतीने पूर्ण केल्या आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा प्री वेङिंगचा व्हिडीओ 52 सेकंदाचा आहे. तिने हा व्हिडीओ शेयर करताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. अंकिता यामध्ये गोजिरीसाजिरी अशी सुंदर नवरी दिसत होती.

See also  बॉलीवुड स्टार्स लग्नात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आकारतात तब्बल एवढं मानधन, शाहरुख खान तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment