सुशांत सिंगची एक गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच ठरलं लग्न, ‘या’ तारखेला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत करणार लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचा सिझन चालू आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण एकापाठोपाठ एक कपल बोहल्यावर चढताना दिसत आहे. तर दुसरीकडे रणबीर व आलिया यांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे. तसेच विक्की कौशल व कतरिनाच्या सुद्धा लग्नाची तयारी सुरू झाली आहे. यामध्येच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सुद्धा लवकरच आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते.

मागील काही वर्षांपासून अंकिता ही विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनीही आपल्या नात्याचा जगासमोर स्वीकार केला आहे. त्यामुळे हे लवकरच विवाह करणार असल्याचे ऐकू येत आहे. इतकंच नव्हे तर 12,13 आणि 14 ङिसेंबर ला हे दोघेजण सप्तपदी घेऊ शकतात. आपल्या नातेवाईकांना यांनी लग्नाचे आमंत्रण पाठवले आहे.

See also  विक्की कौशलच्या "या" तीन गोष्टींमुळेच कतरिना झाली त्याच्यावर फिदा, जाणून घ्या त्या तीन गोष्टी...

ankita vicky jain

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे कपल जवळपास साडेतीन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हल्लीच विक्की व अंकिता यांचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यामध्ये हे दोघे एकमेकांना किस करत असल्याचे दिसले. जसे की आपल्याला सर्वांना माहितच आहे की, विक्की जैन अगोदर अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह सोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही वर्ष एकमेकांना ङेट केल्यानंतर या कपलचे ब्रेकअप झाले.

अंकिता लोखंडे ही “पवित्र रिश्ता” मालिकेतून घराघरांत पोहोचली. तिच्या अप्रतिम अभिनयाचे लाखो चाहते आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे अंकिता च्या लग्नाची बातमी ऐकताच तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. अंकिताचे कित्येक फॅन्स तिला पुढील सुखी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त करत आहेत.

See also  मंदिरा व राज कौशल यांची लवस्टोरी अशी झाली होती सुरू, खूपच हटके होती या कपल मधील केमिस्ट्री...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment