लवकरच बाॅयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार अभिनेत्री अंकिता लोखंडे, मेहंदीचे फोटो झाले व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अंकिता लोखंडे ह्या अभिनेत्रीशी आज प्रत्येकजण परिचित आहे. चित्रपट, मालिका याव्यतिरिक्त एक ना अनेक घडामोडींमुळे अंकिता सतत प्रसारमाध्यमांमधे चर्चेचा विषय राहिली आहे.

पवित्र रिश्ता यासारख्या मोठ्या गाजलेल्या मालिकेतून अंकिता ही संपूर्ण भारतभर घराघरात पोहोचली. आणि आता ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नुकत्याच अशिता या अंकिताच्या बहिणिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर झालेल्या स्टोरीमधील व्हिडीओमधे अंकिता चक्क मेहंदीच्या रंगात रंगलेली पहायला मिळाली आहे.

Untitled design 2020 11 16T070325.079

आणि क्षणार्धात या व्हिडिओचे फोटो कॅप्चर करून सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात झाली. विशेष बाब म्हणजे, अंकिताच लग्न ज्या व्यक्तीसोबत होणार आहे तो विकी जैन हा एक भारतीय बिझनेसमॅन आहे.

See also  भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह अडकला लग्न बंधनात, जाणून घ्या बुमराहची पत्नी संजना आहे तरी कोण?

विकी जैन बाबत महत्वाची बाब म्हणजे तो मुंबई टायगर्स या बाॅक्स क्रिकेट लीगमधील संघाचा मालक आहे. विकी जैन आधी स्पाॅटलाईटच्या प्रसिद्धीपासून शक्यतो दूर रहायचा. परंतु अंकिता त्याच्या आयुष्यात आली आणि अंकिता सोबत तोही पुन्हा पुन्हा स्पाॅटलाईटमधे झळकू लागला.

ankita vicky

विकी जैनच्या व्यक्तिमत्वाबाबत अनेकांना खुप कमी माहिती आहे. अंकिताने बऱ्याचदा सांगितलेलं आहे की, विकी तिच्यासाठी खुप सपोर्टिव्ह अर्थात मदतगार व्यक्ती म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. त्याचा तो खास स्वभाव त्याच्यासोबत एकत्र राहण्यात खास मदत करतो. विकी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. शिवाय ट्रॅव्हलिंग करणं, आपल्या कुटुंबासोबत अगदी मिळूनमिसळून राहणं, स्वभावात शांत व धीरगंभीरता असणं या सर्व चांगल्या खुबी त्याच्याकडे असल्याच अंकिता सांगते.

अंकिता लोखंडे आणि सुशांतची पहिली केमिस्ट्री सर्वांना माहित आहे. दु’र्दै’वा’ने तो आज आपल्यात नाही. काही कारणास्तव अंकिताचा आणि त्याचा ब्रेक-अप झाला आणि विकी सोबत अंकिता काही काळापासून पहायला मिळते आहे.

See also  आर्यन खान ड्र'ग्स प्रकरणातून सुटल्यानंतर पहिल्यांदा अनन्या पांडेने सोशल मीडियावर सोडलं मौन ! व्हिडीओ व्हायरल...

ankita lokhande shares her unseen mehndi ceremony photo in her instagram story

अंकिताच्या व्हायरल झालेल्या फोटोमधून तिच्या चाहत्यांनी आता अचून अंदाज बांधायला सुरूवात केली आहे. अशिताने प्रश्न – उत्तराच्या सेशनमधे इन्स्टाग्रामवर तो व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमधे अशिता प्रेमाने आपल्या लाडक्या बहिणिला अर्थात अंकिता लोखंडेला मिठी मारतानाही दिसत आहे.

अंकिता आता फार काळापासून विकी जैन याला डेट करत आहे. अशात व्हिडिओमधून स्पष्ट होतयं की, अंकिता मेहंदी लावताना तिचा आनंद अगदी भरभरून चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. आता उत्सुकता या बाबीची लागली आहे ते म्हणजे, ते दोघे लग्न कधी करणार? तर लवकरच दोघांच्या मंगलमय समारंभाची गोष्ट ऐकायला मिळो आणि सुखी-समाधानी आयुष्याकडे त्यांनी वाटचाल करो, हीच एक सदिच्छा.

125164157 1033318457183396 1736886308020481692 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment