अंकिता लोखंडेने केला मोठा खुलासा, “सुशांतसाठी मी बाजीराव- मस्तानी, सुलतान यांसारखे मोठे चित्रपट नाकारले”
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृ’त्यू’ला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले. सुशांतच्या मृ’त्यूने देशभरात ख’ळ’ब’ळजनक वातावरण निर्माण झाले होते. आता एक वर्ष लोटूनही गेले असता, त्याच्या आ’त्म’ह’त्ये’मागील नेमकं कारण कोणतं? याचा तपास सुरूच आहे. विशेषतः सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. अंकिताने ह’ल्ली’च मीडियाला मुलाखत दिली. मात्र तिने सुशांत सिंह राजपूत सोबत तिचे ब्रे’कअप कोणत्या कारणांवरून झाले? यावर शांत राहणे योग्य समजले.
अंकिताने आपल्या मुलाखतीत सांगितले की, सुशांत सोबत मी रिलेशनशिप मध्ये असताना मला अनेक मोठमोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मात्र सुशांत साठी मी ते सर्व काही धिक्कारले होते. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या करियरची सुरुवात झी टिव्ही वरील एकता कपूर हिची फेमस सिरियल “पवित्र रिश्ता” मधून केली होती. या शो मधूनच सुशांत सिंह राजपूतने देखील आपल्या करियरची सुरुवात केली होती.
“पवित्र रिश्ता” या सीरियल नंतर अंकिताने “झलक दिख ला जा” आणि “कॉमेडी सर्कस” या शोमध्ये सुद्धा काम केले. त्यानंतर 2018 मध्ये अभिनेत्री कंगना राणौत सोबत “मणिकर्णिका” या चित्रपटातून तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
“पवित्र रिश्ता” या सिरीयल मध्ये करत असताना अंकिताची सुशांत सोबत मैत्री झाली होती. त्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. एकमेकांसोबत 6 वर्षे एकत्र राहिल्यावर 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले व दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले.
अंकिताने सांगितले की, “सुशांत सोबत मी रिलेशनशिप मध्ये होते, तेव्हा सुलतान, बाजीराव- मस्तानी, हॅप्पी न्यू ईयर अशा अनेक उत्कृष्ट मोठ्या फिल्म्स ची ऑफर आली होती. परंतु मी फक्त आणि फक्त सुशांत साठी या फिल्म नाकारल्या. कारण मला सुशांत सोबत लग्न करायचं होतं. आम्हांला आयुष्यभरासाठी एकत्र राहायचे होते.” असे तिने स्पष्टीकरण दिले.
तिने पुढे म्हटले की, फराह मॅडम मला म्हणाल्या होत्या, हॅप्पी न्यू ईयर या चित्रपटाची ऑफर तू घे. आपण तुझं बॉलीवुड मध्ये सुंदर पदार्पण करू. यासाठी मी शाहरुख खान सरांना सुद्धा भेटले होते. परंतु माझ्या ङोक्यात फक्त सुशांतचा विचार घो’टा’ळत होता. कोणत्याही परिस्थितीत माझे सिलेक्शन होऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करत होती. असे तिने सांगितले. मात्र मी ज्या ऑफर्स नाकारल्या, त्याचा मला पश्चाताप होत नाही. एक योग्य पार्टनर म्हणून मी त्याला घडवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते मी केलं. असे अंकिता म्हणाली.
परंतु सुशांत सिंह राजपूत सोबत ब्रेकअप झाल्यावर मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. स्वतःचे खासगी आयुष्य वेगळे कसे ठेवावे, हे मात्र मला कधी जमलेच नाही. पण आता मी ते शिकले आहे. ” इतरांना सत्याची जाणीव नाही. म्हणून ते वारंवार माझ्यावर आ’रो’प करतात. मी कुणालाही दोष देत नाही. सुशांतला जे हवे होते, त्याची निवड त्याने केली होती.” असे सुशांत सोबत झालेल्या ब्रेकअप वर अंकिता लोखंडे हिने सांगितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.