‘चला हवा येऊ द्या’ शो मधील अंकुर वाढवेच्या घरी झाले एका नवीन सदस्याचे आगमन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“आली एक गोडपरी लक्ष्मीच्या पावलांनी दारी” अभिनेता अंकुर वाढवे याच्या घरी एका सुंदर परीचं आगमन झाले आहे. “चला हवा येऊ द्या” या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत आपल्या विनोदी अभिनयाची छाप पाडणारा हा मराठमोळा कलाकार एका मुलीचा बाप बनला आहे.

अंकुर वाढवे याने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या घरी आलेल्या लहानग्या पाहुणीचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे या गोड बातमीने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या फॅन्सना त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी सांगितली आहे.

आपल्या या पोस्ट सोबत त्याने कॅप्शन मध्ये “कालच्या दिवशी मी एका नवीन पात्रात प्रवेश केला आणि एका चिमुकलीचा बाबा झालो.” असे म्हणत त्याने हा गोड क्षण चाहत्यांसोबत शेयर केला आहे.

See also  पुष्पा सिनेमातील स्त्रीवल्ली या गाण्याचा मराठी वर्जन तुम्ही ऐकलात का हो, अमरावतीच्या पोरांची ही कमाल एकदा नक्कीच पाहा.

maharashtra times

त्यामुळे चाहत्यांकङून व इतर कलाकार मंडळींकडून सुद्धा अंकुर वाढवेला हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर अंकुरने शेयर केलेल्या फोटोमधून त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे झळकत असल्याचे दिसते.

“झी मराठी” या वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” या मालिकेतून अंकुर प्रत्येक घराघरांत पोहोचला. तुम्हांला ठाऊक आहे का, अंकुर वाढवे हा फक्त एक उत्कृष्ट अभिनेताच नव्हे तर तो एक चांगला कवी देखील आहे. “पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी” हा त्याचा सुंदर काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.

ankur 3

अंकुर वाढवेने सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केले. आपल्याला मिळालेल्या पहिल्यावहिल्या संधीचं अंकुरने सोनं केलं. त्यानंतर त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, स’र्कि’ट हाऊस, सायलेन्स, आम्ही सारे फर्स्ट क्लास, कन्हैया यांसारख्या अनेक नाटकांत त्याने नवनवीन उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

See also  देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये हा अभिनेता साकारणार डॉ. अजितकुमारची भूमिका...

त्याचप्रमाणे “ज’ल’सा” या मराठी चित्रपटात सुद्धा अंकुरने काम केले होते. एवढ्या सर्व अपार मेहनती नंतर त्याला “चला हवा येऊ द्या” निलेश साबळे प्रस्तुत या शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Bw2Y 6zy

विनोदी भूमिका साकारणारा आपला हा मराठमोळा अभिनेता अंकुर वाढवे याला कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल स्टार मराठी परिवारातर्फे त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. तसेच त्याच्या गोड चिमुकलीला खूप खूप आशिर्वाद.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment