‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने आपल्या चिमुकल्या परीचा फोटो केला शेयर; खूपच गोड दिसते त्याची मुलगी…
अखंड महाराष्ट्राला आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हसवणारी मालिका “चला हवा येऊ द्या” यामधील अंकुर वाढवे या कलाकाराच्या घरी एक आनंदाची बातमी आली आहे. या मालिकेतील उंचीने लहान असणारा, एका शाळकरी मुलाची भूमिका निभावणारा अभिनेता अंकुर वाढवे याला एक सुंदर लहानशी परी झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली आहे.
अभिनेता अंकुर वाढवे याच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी छोटीशी चिमुकली आल्याने तो, त्याची पत्नी आणि इतर सर्व कुटुंबातील लोक खूप खुश आहेत. त्याने आपल्या मूलीसोबत एक भन्नाट सेल्फी काढून सोशल मीडियावर शेयर केला आहे. यामध्ये अंकुरने आपल्या मूलीच्या इवल्याशा हातात हात घालून आपल्या पत्नीसह फोटो काढला आहे.
अंकुरने आपल्या पत्नी व चिमुकली सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेयर करताच त्याच्या फॅन्सनी कमेंट्स मधून त्याला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच “कालच्या दिवशी मी एका नवीन पात्रात प्रवेश केला. मी आता बाप झालो.” असे अंकुरने कॅप्शन सुद्धा दिले आहे.
“झी मराठी” वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” या मालिकेत शालेय गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून तर कधी स्त्रीची भूमिका साकारत आपला हा अवलिया सर्वांचे मनोरंजन करताना दिसतो. त्याच्या या सुप्त कलागुणांमुळे तो आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रसिद्ध झाला आहे. स्टार मराठी परिवारातर्फे अभिनेता अंकुर वाढवे व त्याच्या संपूर्ण परिवारास “कन्यारत्न” प्राप्त झाल्याने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.