झी मराठीवरील आणखी एक नवीन मालिका होणार दाखल… या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी करतेय छोट्या पडद्यावर पदार्पण…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

येत्या काही दिवसांत काही नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. प्रेक्षकांच्या अपुऱ्या प्रतिसादामुळे प्रसारित झालेल्या जवळपास सर्वच मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समजून येत आहे.

किचन कलाकार, बँड बाजा वरात, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, या मालिकांनंतर आता मन उडू उडू झालं.. ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
या मालिकेतील हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी दीपू इंद्राची भूमिका साकारली होती. दीपू आणि इंद्र आता लवकरच लग्न करणार आहेत आणि ही मालिका प्रेक्षकांना अलविदा करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या मालिकेच्या जागी ‘तू चाल पुढं’ ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. ही मालिका 15 ऑगस्ट पासून झी मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. तू चाल पुढं, ही मालिका एका गृहिणीबद्दल आहे जिची मोठी स्वप्ने आहेत. हे स्वप्न पूर्ण करताना तिला तिच्या मार्गात येणारे अडथळे दूर करायचे आहेत.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली अ'ट'क, अभिनेत्रीला बर्थडे पार्टी पडली चांगलीच महागात...

ही मालिका एका गृहिणीची कथा सांगणारी आहे जी घरात तिच्या संसारात रमलेली आहे, स्टार प्रवाहवर आई कुठे काय करते या मालिकेच्या कथेप्रमाणेच ह्या नव्या मालिकेची कथा असल्याचं बोललं जात आहे. या मालिकेची खास गोष्ट म्हणजे मराठी सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब यात मुख्य भूमिकेत दिसत आहे.

दीपा परबने आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे पण आता ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर मराठी मालिकेत दिसणार आहे. तिने अंडा का फंडा या चित्रपटात काम केले पण मालिका निर्मितीमध्ये ती कधीही दिसली नाही. अंकुश आणि दीपा दोघेही महर्षी दयानंद कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते.

कॉलेजमध्ये असताना ते एकांकिका करत असत.  यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. चांगले करिअर सेट केल्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. भरत जाधव आणि केदार शिंदे हे अकुंशचे चांगले मित्र आहेत. कॉलेजमध्ये असताना ते दोघं एकत्र नाटक स्पर्धा करत होते. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दीपाने एकत्र काम केले होते.

See also  या कारणांमुळे मराठी कलाकारांना मिळतात नेहमी बॉलिवूडमध्ये नोकरासारख्या साध्या भूमिका...

त्यानंतर दीपा परब अनेक जाहिराती आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. दीपाने ‘छोटी माँ’, ‘थोडी खुशी थोडा गम’, ‘रेत’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या नव्या मालिकेत दीपा परबसोबतच धनश्री काडगावकर, वैष्णवी कल्याणकर, देवेंद्र दोडके, अन्नपूर्णा विठ्ठल असे अनेक कलाकार दिसणार आहेत.

या मालिकेत धनश्री काडगावकर ननंदेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे धनश्री पुन्हा एकदा विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. या नवीन मालिकेसाठी सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment