अंकुश चौधरीची पत्नी देखील आहे ही मराठमोळी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गुपचूप केला होता दोघांनीही साखरपुडा

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

Ankush Chaudhary’s wife is also a well-known Marathi actress.मराठी सिनेसृष्टीत अनेक सितारे आहेत… त्यापैकी एक अभिनेता अंकुश चौधरी. ज्याने आतापर्यंत दुनियादारी, क्लासमेट, दगडी चाळ या चित्रपटांतून अंकुश चौधरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. मात्र खूपच कमी लोकांना माहीत आहे की, अंकुश चौधरीची पत्नी ही सुद्धा एक मराठमोळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री कोण बरं… हा प्रश्न तुम्हांला देखील पडलाच असेल.

तर मित्रांनो अंकुश चौधरीची ही अभिनेत्री पत्नी म्हणजे दीपा परब. अंकुश चौधरी आणि दीपा परब हे दोघेही 2007 साली लग्नाच्या बेडीत अडकले. तर आता त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, अंकुश व दीपा यांची लवस्टोरी खूपच हटके आहे.

See also  'फॅंड्री' चित्रपटातील जब्या आठवतोय का? आता खूपच रुबाबदार व अफलातुन दिसतोय, पाहा त्याचे फोटोज्...

कॉलेजच्या दिवसांत या दोघांचीही एकमेकांसोबत ओळख झाली होती. ते दोघेही महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून त्या दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवङ होती. कॉलेजमध्ये अनेक एकांकिका मध्ये त्यांनी एकत्रितपणे काम केले. त्याचदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मात्र जोपर्यंत आपले करियर मार्गी लागत नाही. तोपर्यंत लग्न करायचे नाही, असे त्यांनी ठरवले होते.

पुढे 23 नोव्हेंबर 2016 रोजी या कपलचा साखरपुङा पार पडला. मात्र त्यांनी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये आपला साखरपुडा झाल्याचे लपवून ठेवले होते. त्यामुळे मीङियाला सुद्धा त्याविषयी खूप उशीरा समजले. पुढे 2007 मध्ये या ब्युटीफूल कपलने लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे चित्रपट करत अंकुश चौधरी हा मराठी इंङस्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता बनला.

See also  'येऊ तशी कशी मी नांदायला' मधील मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून थक्क व्हाल!

केदार शिंदे यांच्या ऑल द बेस्ट या नाटकात दीपा व अंकुश या जोडीने एकत्र काम केले. त्यानंतर दीपा आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून दिसली. सुबोध भावे व प्रसाद ओक यांसोबतचा तिचा क्षण हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला.

त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी आलेल्या अंङयाचा फंङा या चित्रपटात दीपा झळकली होती. तर आता तिने पुन्हा एकदा अभिनय सृष्टीत पदार्पण केले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी की कहानी या मालिकेत काम करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment