“कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही” अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

प्रत्येक मूलगी ही आपल्या बाबांची परी असते. त्यामुळे सगळे वडील आपल्या लेकीचा शब्द अगदी आवर्जून पाळतात बरं… बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्टार किङस् प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीमधील स्टार किङस् सुद्धा नेहमी चर्चेत असतात. अगदी त्याचप्रमाणे अभिनेता अंशुमन विचारे यांची मूलगी सुद्धा सध्या खूप प्रसिद्धीत आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओज अनेकदा वायरल होत असतात.

175586122 1191066081367878 3045439333992900521 n

हल्लीच तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये लहानगी अन्वी आपल्या बाबांनी म्हणजेच अंशुमन विचारे यांनी कोणत्याही अभिनेत्री सोबत ङान्स करायचा नाही, असे ठामपणे सांगत आहे.

अभिनेता अंशुमन विचारे सोशल मीडियावर एक्टिव असतो. तो बरेचदा आपली मूलगी अन्वीचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करत असतो. तिचे बरेचसे व्हिडिओज वायरल होताना दिसतात. नुकताच त्याने अन्वी सोबतचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ शेयर करत त्याने लिहिले आहे की, माझं काही खरं नाही. कुठल्याही हिरोईन सोबत मुळीच ङान्स करायचा नाही, असे अन्वीने जबरदस्त मध्ये बजावले आहे.

See also  एकेकाळी दारोदारी जाऊन साड्या विकल्या, आज आहे मराठी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

164902999 784553099112646 7376302158440449290 n

या व्हिडिओ मध्ये अन्वी चक्क अंशुमनला ज्या अभिनेत्री सोबत ङान्स केला आहे, तिला व्हिडीओ कॉल लावायला सांगते. अन्वीच्या या अल्लड प्रश्नावर तिची आई माझ्याकडे नंबर नाही, असे अगदी हसत सांगते. तर त्यावर ती म्हणते की, माझ्या बाबासोबत परत ङान्स केला तर मी तिची चांगलीच धु’ला’ई करील.

यावर तिची आई म्हणाली की, आपले बाबा एक कलाकार आहेत. पण तरीही अन्वी मात्र काही केल्या ऐकेना. ती म्हणते की, तरी देखील माझ्या बाबासोबत कुणीच ङान्स करायचा नाही. आपण व्हिडिओ कॉल लावू शकत नाही, पण तिच्या घरी तर जाऊ शकतो. असा तिने ह’ट्ट धरला आहे.

176428531 936208633885826 6158873650149182138 n

इतकंच नव्हे तर ही छोटीशी अन्वी म्हणते कशी माहित आहे का, “बाबाने आईसोबत ङान्स केला तर अन्वीला चालेल. पण इतर कुणी बाबा सोबत ङान्स करायचा विचार सुद्धा करायचा नाही”, असे ती सांगते. या क्यूट चिमुरडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

See also  रोमॅंटिक सीन देताना अभिनेता धर्मेंद्र यांना घाबरून फुटायचा घाम, या अभिनेत्रीने केला खुलासा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment