‘या’ इवल्याशा गोंडस परीला ओळखलंत का? आज आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्या “झी” मराठी वाहिनीची प्रत्येक मालिका ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध होण्याचा जणू वारसा लाभला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण येणारी प्रत्येक नवीन मालिका ही रसिकांच्या मनात घर करून जाते. सध्या “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका खूप लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची केमिस्ट्री लोकांना खूपच आवडलेली दिसते.

Anvita Phaltankar 1

या मालिकेत स्वीटूची भूमिका साकारत असलेली अन्विता फलटणकर हिने आपल्या निरागस व सोज्वळ स्वभावाने चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू केली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणेच अन्विता देखील आपल्या सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. आपले फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करून ती फॅन्सच्या संपर्कात असते.

See also  "तुझ्या माझ्या संसाराला काय हवं" या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्या बद्दल माहितीये?

मागे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने सोशल मीडियावर आपला लहानपणीचा आईवडिलांसोबतचा फोटो शेयर केला होता. तिच्या त्या क्यूट आणि मनमोहक फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला. तुम्ही जर कधी सहजच अन्विताच्या इन्स्टाग्रामवर एक नजर फिरवली तर ती आपल्या रियल लाइफ मध्ये देखील खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे, हे तुम्हांला दिसेल.

anvita phaltankar in yeu kashi tashi me nandayla episode 87 2021

अन्विता फलटणकर हिने याआधी अनेक मराठी सिनेमांत काम केले आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या “टाइमपास” या चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रीणीची भूमिका अन्विताने साकारली होती. इतकंच नव्हे तर 2019 मध्ये आलेला जबरदस्त अफलातुन सिनेमा “गर्ल्स” यामध्ये तिने ‘रू’मी’ ची भन्नाट भूमिका साकारली आहे.

त्याचप्रमाणे “Why So गं’भी’र” या नाटकात पण तिने काम केले आहे. अगदी 4 वर्षांची असल्यापासूनच अन्विताने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. तिने “रुंजी” आणि “चतुर चौकङी” या मालिकांमध्ये देखील उत्कृष्ट काम केले आहे.

See also  कारभारी लयभारी मालिकेतील ‘गंगा’चं खरं आयुष्यात ट्रान्सजेंडर आहे, रियल लाईफ स्टोरी ऐकून थक्क व्हाल!

Anvita Phaltankar plays Rummy in Girlz Movie Actress

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment