तब्बल 7 वर्षांनंतर हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता होणार बाप, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?
फिल्म इंडस्ट्रीत स्टार म्हणून वावरणाऱ्या सर्वांपैकी अनेकांना हे वर्ष खूप वेगळं गेलेलं आहे. म्हणजे आयुष्य आनंदाने भरून आलेलं आहे. खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे कुणी या वर्षात लग्न केलं तर कुणाला मुलं मुली झालेले आहेत.
आई आणि बाप होणं म्हणजे जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की जी सध्या इंडस्ट्रीत एका अजून स्टार च्या घरात बाळ आलेलं आहे आणि तेही तब्बल सात वर्षांनंतर. तर आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल की तो अभिनेता नेमकं कोण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
२०२१ हे वर्ष प्रत्येक कलाकारासाठी खास ठरतंय. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. तर काही कलाकारांच्या घरी चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. अनुष्का-विराटच्या घरी ‘वामिका’चा जन्म झाला. तर कपिल शर्मा- गिन्नी चतरथने मुलाचं स्वागत केलं.
तसेच करीना पण दुसऱ्यांदा आई झाली आहे. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. आयुष्मान खुरानाचा लहान भाऊ आणि अभिनेता अपारशक्ती खुराना लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी आकृती गरोदर असल्याचं समजतं.
मीडिया रिपोर्टनुसार, अपारशक्ती-आकृती त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये आकृती बाळाला जन्म देईल. दोन्ही कुटुंबात यावेळी आनंदाचं वातावरण आहे. मात्र अद्याप खुराना कुटुंबियांनी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. म्हणजे अजून दोघांनी ही गोष्ट बाहेर कळलेली नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अपारशक्ती खुरानाने आकृती आहुजासोबत २०१४ साली लग्न केलं. दोघांची ओळख चंदीगडमधील एका डान्स क्लासमध्ये झाली. आकृती अनेकदा अपारशक्तीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आकृतीची खुराना कुटुंबासोबतची बॉन्डिंग खूप खास आहे. अपारशक्तीने देखील सिनेमात पदार्पण करण्यापूर्वीच लग्न केलं होतं.
त्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं लग्नात झालं आहे. आता ते आई बाप होणार आहेत आणि ती जगातली सर्वात आनंदाची आणि जबाबदारी ची गोष्ट आहे.
अपारशक्तीला २०१६ रोजी आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. या सिनेमात त्याने फोगट बहिणींच्या चुलत भावाचा रोल केला होता. तसेच सिनेमाची कथा सांगणारा नरेटर देखील होता. या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुक झालं. त्यानंतर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘हॅप्पी’ सारख्या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारली. अपारशक्ती लवकरच ‘हेल्मेट’ आणि ‘कनूप्रिये’मध्ये दिसणार आहे.
अपार शक्ती हा ही भावा सारखाच उत्तम अभिनेता आहे. त्याचं आत्तापर्यंत केलेलं प्रत्येक काम वाजलेले आहे. त्याने काही शो सुध्दा होस्ट केलेले आहेत. त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.