‘आपली आजी’ या तुफान लोकप्रिय फूड चॅनलच्या या आजी नेमक्या आहेत तरी कोण? यूट्यूब वरून कमावतात लाखो रुपये…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सुमन धामणे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा कासार या छोटयाशा गावच्या रहिवाशी. विशेष म्हणजे आजवर सुमन आजी कधीही शाळेत गेलेल्या नाहीत. तरीही त्यांचा नातू यश पाठक याच्या मदतीने त्यांनी ‘आपली आजी’ नावाचे एक यूट्यूब चॅनल सुरू केले आहे, ज्याद्वारे त्या लोकांना पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृतीबद्दल संपूर्ण माहिती सांगून त्या बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवितात. अवघ्या ६ महिन्यांत या चॅनलने तब्बल ६ लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला असून सध्या चॅनेल खूपच लोकप्रिय झाले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील या सत्तरीतील महिलेने यूट्यूबवर जोरदार धडक दिली आहे.

अहमदनगरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर असलेल्या सारोळा कासार गावच्या सुमन धामणे या आजी आहेत. आजवर सुमन धामणे आजींनी त्यांच्या या युट्युब चॅनेलवर १६५ पेक्षा जास्त विविध प्रकारच्या टेस्टी रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. रेकी व्हिडिओ शेअर केले आहेत. सत्तरीच्या धामणे आजी म्हणतात की त्यांना यापूर्वी युट्यूब व इंटरनेटबद्दल काहीच माहिती नव्हती. सोशल मीडियावर आपल्या रेसिपीबद्दल इतका बोलबाला असा त्यांनी स्वप्नांतही विचार केला नव्हता.

See also  बॉलीवूडमधील हॉरर फिल्मचे सर्वात खतरनाक भूत 'सामरी' ज्याला पाहिल्यावर लोक भीत असे, आज जगत आहेत असे जीवन...

सुमन आजी पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार केलेल्या घरगुती मसाल्यांनी महाराष्ट्रीयन पदार्थ बनवतात. त्याच्या या पारंपरिक पाक कौशल्याचा लोकांवर खूप प्रभाव पडत आहे. दररोज ४००० पेक्षाही जास्त नवीन लोक चॅनेलवर सदस्यता घेत आहेत आणि अक्षरशः कोट्यावधी लोक त्यांचे व्हिडिओ पाहत आहेत. लाईक व शेअर करत आहेत.

या कामी सुमन आजींना त्यांचा अकरावीत असलेला १७ वर्षीय नातू यश पाठक हा सर्व तांत्रिक सहाय्य करतो. जसे व्हिडिओ बनविणे, तांत्रिक पूर्तता करून अपलोड करणे इ. केले. याची सुरुवात कशी झाली हे सांगतांना यश म्हणतो, “सुट्टीत मी एकदा आजीला पाव भाजी बनविण्यास सांगितले. ती म्हणाली मला येत नाही. मग मी तिला यूट्यूब वर काही रेसिपीचे व्हिडिओ दाखविले. ते पाहिल्यानंतर आजी म्हणाली की, “मी याच्यापेक्षा सुद्धा भारी बनवू शकते.” यश पुढे म्हणाला की,” त्या रेसिपीमध्ये आजीने काय बदलले हे माहित नाही, परंतु तिने बनवलेली पावभाजी खाल्ल्यानंतर त्याचे कुटुंब अक्षरशः बोटं चाटत राहिले. असे सर्वच पदार्थांसोबत सुरू झाले आणि मग यशला यापासून एक YouTube चॅनेल सुरू करण्याची कल्पना सुचली.

See also  म्हणूनच उद्धव ठाकरेंनी पाहिले असावे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न...

यश म्हणतात की त्याने थोडीशी पूर्व तयारी आणि नियोजन केले. त्यानंतर मार्चमध्ये त्याने पहिला व्हिडिओ (भरले मसाला कारले) अपलोड केला. हळूहळू चॅनेलला प्रेक्षक मिळू लागले. सुरुवातीला त्यांनी शेंगदाणा चटणी, हिरव्या भाज्या, महाराष्ट्रीयन मिठाई, भरले वांगे आणि इतर पारंपारिक पदार्थ बनवले. प्रेक्षकवर्ग वाढतच होता इतका की, अलीकडेच त्यांनी बाकरवाडी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यास २ आठवड्यांत सुमारे २० लाख लोकांनी पाहिले आहे. ‘

तथापि, आजी आणि अकरावीत शिकणाऱ्या या मुलासाठी हे चॅलेंज खूप चढउतारांनी भरलेले ठरले. सुमन आजी सांगते की, जेव्हा तिच्या नातवाने तिच्यासमोर चॅनेल सुरू करण्याचा विचार मांडला तेव्हा ती खूप उत्साही होती. पण समस्या अशी होती की आयुष्यात ती कधीच कॅमेऱ्यासमोर गेली नव्हती. म्हणून ती खूप अस्वस्थ होती.

प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेल की नाही याची तिला नेहमीच चिंता होती. पण सरावाने हळूहळू ती आता सर्व शिकली आहे. सुमनआजी म्हणते, “मी प्रयत्न केला आणि मला यश मिळालं. सगळ्यांनी कौतुक केल्यावर मला खूप आनंद झाला. मला “यूट्यूब क्रिएटर” पुरस्कार मिळाला. माझ्या कुटुंब आणि नातेवाईकांना माझा खूप अभिमान आणि कौतुक वाटते.”

See also  'शोले' चित्रपटातील गब्बरची मुलगी आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड, तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या...

सुमन आजींनी आता प्रेक्षकांच्या अधिक मागणीमुळे पारंपारिक मसाले स्वतः तयार करून विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पारंपारिक स्वयंपाकाच्या पद्धती आणि मसाले हे त्यांचे खाद्यप्रकार फारच लोकप्रिय होत आहेत. शेकडो लोकांनी मसाला मागितला आणि म्हणून सुमन आणि यश यांनी पारंपारिक मसाले बनवून विक्री करण्यास सुरवात केली.

सुमन आजींना त्यांच्या ३० एकर शेतीत विविध शेतीविषयक प्रयोगशील उपक्रमांद्वारे आवश्यक ते उत्पादन घेऊन शक्य तितक्या लोकांपर्यंत आपल्या पाककृती व मसाले पुरवठा करणे सुरू ठेवायचे आहे. या शिवाय मागणीनुसार दसरा आणि दिवाळीच्या सणांसाठीही विविध प्रकारचे पदार्थ बनवले असल्याचेही सुमन आजी सांगतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment