महाराष्ट्रातील या रेल्वे स्टेशनवर शूट होतात बॉलीवूडमधील सर्वात जास्त चित्रपट, एका चित्रपटासाठीची फीस ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारतीय रेल्वेचे, आपल्या महाराष्ट्रातील एक रेल्वे स्टेशन बहुतेक सर्वच बॉलीवूड फिल्म्सच्या शूटिंगसाठी एक प्रसिद्ध डेस्टिनेशन ठरत आहे. या स्टेशनवर फिल्म्सच्या शूटिंगसाठी बॉलीवूड फिल्म निर्मात्यांकडून रेल्वे लाखो रुपये भाडे आकारते.

याच रेल्वे स्टेशनवर शाहरुख आणि काजोलच्या दिलवाले दुल्हनीयां ले जायेंगे चे आयकॉनिक ट्रेन सीन शूट करण्यात आलेले आहेत. याशिवाय कितीतरी अनेक फिल्म्स, टीव्ही सिरियल्स आणि वेबसीरीज मधील रेल्वे सीन्स सुद्धा येथे चित्रीत करण्यात आले आहेत आणि अद्यापही चित्रित केले जात आहेत. हे सुप्रसिद्ध रेल्वे स्टेशन आहे, आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील “आपटा” रेल्वे स्टेशन.

thumbnail11141534864915

आपटा रेल्वे स्टेशनवरच बहुतेक वेळा ट्रेन सीन्सचे शूटिंग केले जाते. अनेकदा फिल्म्समधील रेल्वे स्टेशनाचा देखावा आणि पासिंग ट्रेनच्या बाहेरचे सुंदर दृश्य तुम्ही पाहिले असेलच. बऱ्याच वेळा असे दिसते की हा देखावा प्रत्यक्षात फिल्मधील त्याच स्टेशनवर चित्रीत करण्यात आला आहे जिचा फिल्ममधे उल्लेख आहे. पण हे सत्य नसते. फिल्ममधे दाखवले जाणाऱ्यां बहुतेक रेल्वे दृश्यांचे शूटिंग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आपटा याच रेल्वे स्टेशनावर शूट करण्यात येते.

See also  जेव्हा अभिनेत्री रेखाने 13 वर्षांनी लहान अक्षय कुमारसोबत दिला होता इं'टिमेट सीन, त्यानंतर जे झाले...

आपटा रेल्वे स्टेशन हे फिल्मसिटीपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. बॉलिवूड फिल्म निर्मात्यांसाठी फिल्ममधील ट्रेन दृश्यांसाठी आपटा स्टेशन सर्वात योग्य स्थान आहे. मुंबई फिल्म सिटीपासून अवघ्या दोन तासाच्या अंतरावर असलेले हे स्टेशन बहुतेक सर्वच निर्मात्यांची पहिली पसंती मानली जाते. या स्टेशनाचे सुंदर दृश्य सर्वच कॅमेरामेन आणि दिग्दर्शकांना आकर्षित करते.

7 ddlj train apta mistake

आपटा रेल्वे स्टेशन आजूबाजूला सुंदर पर्वत, नद्या आणि फिर्यादींनी वेढलेले आहे मुंबईपासून फक्त ८४ कि.मी. अंतरावर असलेले आपटा रेल्वे स्टेशन फिल्म्सच्या शूटिंगसाठी सर्वात योग्य स्थान आहे. स्टेशनच्या एका बाजूला डोंगर आणि नदीचे एक सुंदर दृश्य आहे, दुसऱ्या बाजूला मुख्य रुंद रस्ता रुळासारखा धावतो.

म्हणूनच आपटा स्टेशन फिल्माच्या शूटिंगसाठी प्रसिध्द आणि सोयीचेही आहे. शूटिंगची संख्या म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई नंतर आपटा स्टेशन हेच नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

See also  अभिनेता ऋतिक रोशनची नवीन गर्लफ्रेंड आहे खूपच बोल्ड आणि सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो

images 1524810994539 film shooting new

पीटीआयच्या अहवालानुसार रायगड जिल्ह्यातील आपटा रेल्वे स्टेशन हे फिल्म्स शूटिंगच्या च्या माध्यमातून भारतीय मध्य रेल्वेला दरवर्षी २५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न भाडे म्हणून मिळवून देते. अहवालानुसारमध्ये भारतीय रेल्वेने या स्टेशन वरील फिल्म्सच्या शूटिंग च्या माध्यमातून केवळ भाड्यापोटीच आजवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

याच स्टेशनवर शाहरुख खान आणि काजोलच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचे आयकॉनिक सीन शूट केले आहेत. याशिवाय शाहरुख खानचा कुछ कुछ होता है, आमिर खानचा रंग दे बसंती, अक्षय कुमारचा खाकी, टायगर श्रॉफचा बागी, आयुष्मान खुरानाचा शुभमंगल सा’व’धा’न यांसह डझनभर सुपरहिट फिल्म्स, टीव्ही सिरियल्स आणि वेबसिरीज इ. शूटिंग झालेले आहे. असे हे रेल्वे स्टेशन आपल्या महाराष्ट्रात आहे, आणि बॉलीवूड प्रमाणेच ते सुद्धा सुप्रसिद्ध आहे, ही आपल्या सर्व मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

See also  नेहा कक्करने मेहंदी समारंभात घातलेल्या या हिरव्या लेहंग्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment