अपुर्वा नेमळेकरला सोडावी लागली अर्ध्यावर मालिका, तुझ माझं जमतंय मध्ये अवतरणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…

सध्या झी युवा या मराठी वाहिनीवरील “तुझं माझं जमतंय” ही मालिका चांगलीच प्रसिद्धीस आलेली पहायला मिळते आहे. एकीकडे या मालिकेला सुरू होऊन महिनाभरली लोटला नसताना या मालिकेत हळूहळू मोठे बदल घडण्याची चिन्हे समोर येताना पहायला मिळत आहेत.

नुकतचं आता जी बाब आपल्या रसिकप्रेक्षकांसमोर येते आहे ती म्हणजे, या मालिकेतून आता रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रसिद्ध झालेली शेवंता अर्थात अपुर्वा नेमळेकर हिची या मालिकेतून लवकरचं एक्झिट होणार आहे. आता चर्चा याच्याही काही काळ सोशल मीडियावर रंगल्या होत्या की, अपुर्वाच तुझ माझं जमतंय या मालिकेतलं “पम्मी” हे पात्र कोण निभावणार? किंवा तिच्याइतकंच ते पात्र बखुबीने कोण वठवू शकेल?

आणि मुद्याची बात यानंतर जे नाव समोर आलं ते म्हणजे, झी मराठी वाहिनीवर चालू असलेल्या “देवमाणूस” या मालिकेतल्या “मंजू” या पात्राची भुमिका साकारणाऱ्या प्रतिक्षा जाधव या अभिनेत्रीचं. म्हणजे एकूण काय तर, पम्मी या पात्रासाठी अपुर्वाला आता प्रतिक्षा जाधव रिप्लेस करताना पहायला मिळेल.

प्रतिक्षाने याआधी मराठी सिनेसृष्टीत चांगली कामे केली आहे. नाटक, हिंदी मालिका, मराठी सिनेमेदेखील तिने आजवर केले आहेत. मुळच्या पुण्याच्या असलेल्या प्रतिक्षाला नृत्यकलेतही रस आहे. खेळ आयुष्याचा, जखमी पोलीस, दिल धुंडता है, मेंदीच्या पानावर अशा काही तिच्या आजवरच्या उत्तम कलाकृती आहेत.

मालिका वाहिन्यांमधे तुझं माझं जमतंय या मालिकेने रसिकप्रेक्षकांच्या मनावर सध्या भुरळ पाडलेली आपल्याला पहायला मिळते आहे. आशू, पम्मी आणि शुभू अशा तिन पात्रांवर प्रेक्षकांच अतुट प्रेम जुळताना पहायला मिळत आहे. पण चाहत्यांसाठी एकप्रकारे पम्मी या पात्राच्या बदली भुमिकेबाबत काहीशी चांगली अथवा वाईट बातमीही ठरू शकते.

अपुर्वाच्या चाहत्यांना निश्चितच तिने पम्मी हे पात्र निभवावं वाटतं असेल. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे तिला ही मालिका सोडावी लागल्याचं कळत आहे. दुसरीकडे पम्मीच्या भुमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हा विषय समोर येताच प्रतिक्षा जाधव हे नाव सर्वप्रथम पुढे आलं आहे. प्रतिक्षा सध्यातरी देवमाणूस या मालिकेत तिची भुमिका उत्तमरित्या वठवताना पहायला मिळत आहे.

देवमाणूस या मालिकेत मंजुळा ही भुमिका प्रतिक्षा साकारत आहे. या भुमिकेने प्रतिक्षाला खऱ्या अर्थाने एक नवी ओळख दिली आहे. पण आता प्रतिक्षाकडे नवी जबाबदारी असेल हे निश्चित आहे.

नव्या भुमिकेबात प्रतिक्षा बोलली आहे. ती म्हणाली की, देवमाणूस मधल्या भुमिकेनंतर एक आधीच लोकप्रिय असलेली भुमिका वाट्याला येत असल्याने त्या पात्राला न्याय द्यायची जबाबदारी थोडी आधीपेक्षा मोठी असेल, मी सर्वोत्तोपरी तो प्रयत्न करेन आणि प्रेक्षकांना ती भुमिका आवडेलही. असा विश्वास तिने व्यक्त केला. तिने या पात्राची निवड केल्याबद्दल झी युवा वाहिनीचे आभारदेखील मानले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment