सैराट चित्रपटासाठी आर्चीच्या पात्रासाठी अभिनेत्री शोधत असताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना दिसली रिंकु ! आणि मग…

.

मराठी चित्रपटसृष्टीचा जर विचार केला तर अनेक कलाकार हे इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या हिमतीवर आले. इथे त्यांनी मनापासुन काम करून हक्काचं स्थान मिळवलं. पण काही असे कलाकार आहेत की जे दिग्दर्शकाच्या नजरेस हिरा म्हणुन सापडले.

पुढे त्यावर दिग्दर्शकाने काम करून हिऱ्याचं रुपांतर हिरो – हिरोईन मध्ये केलं. त्यामध्ये सध्या आघाडीवर नाव घेतलं जातं आर्ची परश्याचं. आज आपण आर्ची कशी सैराट मध्ये येऊन सुपरहिट झाली, ते जाणुन घेणार आहोत.

नागराज मंजुळे हे सैराट चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या शोधात करमाळ्यात हिंडत होते. जवळच जेऊर हे गाव होतं. जिथं त्यांचं बालपण गेलं. कथा आणि कथेची भाषा ही सोलापुरी बोलीभाषा होती. त्यामुळे त्यांना इथल्याच मातीतली मुलगी हवी होती. त्यांनी अनेक मुली पहिल्या; पण कुणीही त्यांच्या पसंत पडत नव्हत्या. लिहिलेल्या पात्राला न्याय देत नव्हत्या.

एके दिवशी काही कामानिमित नागराज आणि टीम अकलुज गेले. तिथे एक बिनधास्त, निर्भीड, गावकरी भाषेत नडेल त्याला फोडणारी काळी सावळी निरागस मुलगी त्यांच्या नजरेस पडली. जसं पात्र होतं अगदी तशीच मुलगी होती. चौकशी केली. तेव्हा समजलं तिचं नाव ‘ रिंकू राजगुरू ’, होतं.
तिच्या घरच्यांशी बोलुन तिला ऑडिशनला बोलवण्यात आलं.

जेव्हा रिंकूला कळलं की आपल्याला कुणीतरी मंजुळे नावाचा दिग्दर्शक पिक्चर मध्ये घ्यायचा विचार करतोय, तेव्हा तिला खुप आनंद झाला. कारण तिला काहीतरी नवीन भन्नाट काम करायला मिळणार होतं म्हणुन ती आनंदी होती. दिग्दर्शक म्हणजे कुणीतरी मोठा माणूस असणार. राहणीमान भारी असणार वगैरे वगैरे. अश्या अनेक कल्पना डोक्यात घेऊन रिंकू नागराज कडे ऑडिशन ला गेले.

पण तिथं गेल्यावर तिच्या नजरेस पडला अत्यंत साध्या कपड्यातला उच्च विचारांचा दिग्दर्शक नागराज मंजुळे. तिने पाहिलेल्या सगळ्या कल्पना कोलमडल्या. पुढे तिच्यावर नागराज ने खुप काम केलं. तिच्यातली रिंकू घालवुन आर्ची ला मनात बसवलं.
शूटिंग सुरु झाली. नागराज सर वरून रिंकू अण्णावर आली. नातं अजुन घट्ट होत चाललं होतं. आणि चित्रपट ही खूप उत्तम बनत चालला होता. सगळं शूट झालं.

पुढे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. लोकांना इतका आवडला की एकदा नव्हे तर दोनदा तीनदा तिकीट काढून चित्रपट लोकं पाहू लागले. आर्ची परश्या प्रचंड लोकप्रिय झाले.

अजूनही रिंकू म्हणते की जर नागराज अण्णा मला त्यावेळी भेटले नसते तर आज मी कुठेच नसते. सैराट चित्रपटाने तिचं भविष्य उज्वल केलं. आज ती मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फक्त सैराट, नागराज आणि तिने घेतलेल्या स्वतःवरच्या कष्टामुळे..

रिंकू म्हणजेच आर्चीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

Leave a Comment