भारतीय सैन्याच्या वाहनांची नंबर प्लेट सामान्य वाहनांपेक्षा वेगळी का असते?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

न्यातील गाड्यांच्या नंबर प्लेट वेगळ्या असण्याची २-३ कारणे आहेत

१. या गाडयांना आपल्यासारखे RTO चे नियम लागू होत नाहीत

२. या गाड्यांचा मालकी हक्क हा एकाच आर्मीच्या खात्याकडे असतो. त्यामुळे यांना अनुक्रमणिकेप्रमाणे नंबर वाटले जातात.

३. ती गाडी कोणत्या कामासाठी वापरली जाऊ शकते हे त्या नंबर मधून लगेच कळते आणि ती फक्त त्याच कामासाठी वापरली जाते. म्हणजे एखादी गाडी हि सैन्याच्या हालचालीसाठी युद्धभूमी/देशाच्या सीमेवर वापरण्यात यावी या उद्देशाने घेतली असेल तर ती फक्त त्याच कामासाठी वापरतात. त्यातून कधी सामान ने-आण करत नाहीत. (खरेतर करतात पण अगदी नियमाप्रमाणे बघायचे झाले तर करायचे नसते)main qimg e5456fd9c170eb2eb2126f934b0ba95e

See also  बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप

गाडीचा नंबर आहे

main qimg 0e559a7ac6256af26df99da8e4bb9b2b

यातला वर जाणारा बाण नंबर प्लेट लावण्याची योग्य स्थिती दर्शवतो. म्हणजे त्या बाणाची दिशा हि कायम वरच असली पाहिजे. अगदी सहज आणि पटकन कळावे नंबर प्लेट गाडीला लावताना हा याचा उद्देश आहे

18: हा नंबर ती गाडी कोणत्या वर्षी तयार झाली ते सांगतो. १८ म्हणजे २०१८ साली तयार झालेली गाडी आहे

B128761: यात सैन्याच्या तळाचा क्रमांक (Base code) आणि त्याला लागूनच पुढे लगेच गाडीचा अनुक्रमांक असतो.

K: म्हणजे हि गाडी केवळ जवानांच्या प्रवासासाठी वापरली जाऊ शकते. यात रुग्णवाहिका म्हणून पण वापरता येईल जेंव्हा K असते शेवटी तेव्हा. म्हणजे K लिहिलेल्या गाडीत प्रथमोपचाराशिवाय इतरही काही जुजबी रुग्णवाहिकेचे सामान ठेवले असते. जसे स्ट्रेचर, छोटा प्राणवायूचा सिलेंडर, सलाईन इत्यादी.

See also  ‘अशा लोकांना जास्त महत्व देण्याची गरज नाही’, आमदार रोहित पवारांचे नितेश राणे आणि सदाभाऊ खोतांच्या टीकेला प्रत्युत्तर

K प्रमाणे इतरही काही मला माहिती असलेली अक्षरे आणि त्यांचे अर्थ पुढीलप्रमाणे

F: क्रेन

P: पाण्याचा टँकर

M: रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार रोड रोलर

D: अवजड वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा ट्रक (रणगाडे, मिसाईल वगैरे वाहतुकीसाठी)

– कैलास कुलकर्णी

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment