ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका बनली आहे महाराष्ट्रशी क्रश, पहा तिचे मनमोहक फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी कला क्षेत्रात आघाडीवर अभिनेत्री आणि गायिका म्हणून असलेलं एकमेव नाव ते म्हणजेच आर्या आंबेकर. होय, जे नाव आज मराठी मधील लाखो चाहत्यांच्या हृदयात कोरलेलं आहे. आणि का नसावे कारण ती आहेच खूप देखणी. हे तर काहीच नाही आर्या ही मराठी मधील सर्वांची आवडती क्रश सुद्धा बनलेली आहे.

whatsapp image 2021 06 17 at 11.52.08 am 1 202106636702

तिने आयुष्याची सुरुवात केली सारे ग म प या शो मधून आणि अनेक वर्षांनी आज ती स्वतः एक विशिष्ट यशाच्या स्तरावर आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले.

आर्याने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्या सध्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे.

See also  'मुलगी झाली हो' मालिकेतील मधील एसीपीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल महितेय?

73157278

सध्या आर्या सगळ्यांची क्रश बनली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिच्या सौंदर्यावर, आवाजावर सगळेच फिदा आहेत. तिच्या सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट करतात.

गायनाबरोबरच अभिनयातही आर्याने नाव कमावलं आहे. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिने मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली.

Aarya Ambekar Wallpapers

आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते.

See also  "मूलगी झाली हो" कार्यक्रमात किरण माने यांची व्यक्तिरेखा साकारणार हा अभिनेता...

नुकतीच आर्या ने सोशल मीडियावर नव्या सारे ग म प शो साठी कॉमेंट केली होती. ती नेमकी काय आहे तेही बघून घेऊ चला.

10 07 2019 5711 aarya ambekar marathi actress (25)

नमस्कार…??
आजपासून सारेगमप लिटिल चॅम्पस् चं नवीन पर्व सुरू होतंय. त्या निमित्त ही पोस्ट. आपणा सर्वांना माहितच आहे, १२ वर्षांपूर्वी झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्पस् मध्ये मी एक स्पर्धक होते. ह्याच स्पर्धेमुळे मी “संगीत” हे करिअर म्हणून निवडलं. माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. आणि आजही मी ह्याच मार्गावरून पुढे जात, संगीत क्षेत्रात काहीतरी विशेष करून दाखविण्याचं ध्येय बाळगून आहे.

१२ वर्षानंतरही झी मराठी आणि लिटिल चॅम्प्स ह्यांना माझ्या हृदयात तेच अढळ स्थान आहे. मात्र यावेळी माझी भूमिका बदलली आहे. ह्या बदललेल्या भूमिकेत छोट्या स्पर्धकांची मैत्रीण, त्यांची एक मार्गदर्शक, त्यांची ताई म्हणून काम करायला मला खूप आनंद होतोय!!

See also  अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा साखरपुडा सोहळा संपन्न, या प्रसिद्ध व्यक्तीसोबत लवकरच होणार ती विवाहबद्ध

Aarya Ambekar

आजपर्यंत स्पर्धक म्हणून असो, गायिका असो, अभिनेत्री असो, तुम्ही माझ्या कलेला प्रेमाने स्वीकारलंत, माझ्या पाठीशी उभे राहिलात, पुन्हा पुन्हा मला प्रोत्साहन दिलंत. ह्या नव्या भूमिकेसाठीही आपल्या सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील अशी आशा करते. झी मराठी लिटिल चॅम्पस् चं हे नवीन पर्व पाहायला विसरू नका. गुरुवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता.

तर आर्या आंबेकर ला असेच उतुंग असे यश नेहमी मिळत राहो यासाठी स्टार मराठी कडून तिला स्टार शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment