प्रसिद्ध व्यक्तीला डेट करण्याबाबत आर्या आंबेकरने अखेर केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात रुतून बसलेली गायिका म्हणजेच, आर्य आंबेकर. आर्या आंबेकर ही सर्वांत तरुण आणि लोकप्रिय अशी गायिका आहे. जिच्या गाण्यांवर सर्वच आज मंत्रमुग्ध होत आहेत;

कारण तिच्या आवाजात एका प्रकारची जादू आहे. ती खूप चर्चेत आहे. तिच्या डेट करण्यावर सोशल मीडियावर रंगलेल्या प्रकरणात आता तिने स्वतःच उडी घेतलेली आहे. तिने अखेर मौन सोडलेलं आहे. ती काय म्हणाली ? तिच्या प्रेम प्रकरणावर चला सविस्तर जाणून घेऊयात.

आर्या आंबेकर इंडस्ट्रीत कशी आली ? बाल वयातच तिने या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेलं आहे. झी मराठीवर २००८ मध्ये एक कार्यक्रम खूप रंगला होता. गाण्यांचा. सारे लहान गायक गायिका मंडळी त्या कार्यक्रमात होती. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हे त्या कार्यक्रमाचे नाव. या मराठी रिअ‍ॅलिटी शो मध्येच आर्या आंबेकरला ( Arya ambekar ) ला खरी ओळख मिळवून दिली, असं म्हणायला हरकत नाही.

See also  "कर्जाचा डोंगर असल्याने जुनी गाडी वापरायचो...", जाणून घ्या आदिनाथ कोठारे आयुष्यातला सं'घर्षमय प्रवास...

तिने आजपर्यंत कोणती कामे केली ? तिने खूप लोकप्रिय अशी गाणी दिलेली आहे, तसेच एका चित्रपटात अभिनय सुद्धा केलेला आहे. तसा विचार केला तर आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.

तिचा आवाज खूपच गोड आहे. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांनी भुरळ घातली आहे.कारण ती सुदंर सुद्धा तेवढीच आहे जेवढं गोड गाते.

ज्या शो ने काही वर्षांपूर्वी बाल वयात सहभागी म्हणून लोकप्रिय केलं होतं, प्रसिद्धी दिली होती आज त्याच शो ची ती परीक्षक आहे. त्यामुळे सुद्धा ती खूप चर्चेत होती; पण आता ती डेटिंग करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मध्यंतरी खूप व्हायरल होत होत्या, ज्यावर आता अखेर तिने मौन सोडून भावना व्यक्त केल्या आहेत.

See also  "तू तेव्हा तशी" फेम अनामिका माहितेय ना ?.....तिच्या पतीला पाहिलं का....करतो हे काम..

काय म्हणाली ती ? अनेक दिवसांपासून आर्या आंबेकर मराठी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आर्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

ती म्हणाली “आधी दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. मात्र माझ्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. शिवाय काही ओळखीच्या व्यक्तीं त्याबद्दल काही गोष्टी बोलत असल्याचं कळालं. त्यामुळे स्पष्ट करण्याच ठरवलं” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं.….आता यावरून सुद्धा पूर्णपणे गोष्टी लक्षात येत नाही; पण चाहते अंदाजाच्या वावड्या मात्र बांधत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment