शाहरूख खानने घेतला अखेर मोकळा श्वास, आर्यनला मिळाला शेवटी जामीन…
आर्यन खान क्रूझ ङ्र’ग्ज प्रकरणात सापडल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याला कित्येक दिवसांपासून जामीन काही मिळत नव्हता. मात्र आज अखेर शाहरुख खानचा लाडका चिरंजीव आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. तब्बल 24 दिवस तु’रुं’गात राहिल्यावर आर्यनची सुटका सरतेशेवटी झाली. मागील बर्याच कालावधीपासून सर्वांचे लक्ष आर्यनच्या सुनवाईकङे लागले होते. त्यामुळे आता आर्यनची दिवाळी आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी होणार यामुळे शाहरुख च्या चाहत्यांना भरपूर आनंद होत आहे.
आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यावर ताबडतोब लिगल टीमने शाहरुख खानची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे फोटोज् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. या फोटोज् मध्ये शाहरुख च्या चेहऱ्यावर प्रसन्नदायी हास्य दिसत आहे. आर्यन खानची बाजू स्पष्टपणे मांडण्यासाठी भारताचे माजी ॲटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांसह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे हे देखील न्यायालयात हजर होते.
आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद सुरू केल्यावर एनसीबी च्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी त्याची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय ऐकवला. वकिलांची खूप मोठी टीम आर्यन खान च्या जामिनासाठी काम करत होती.
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की,”अरबाज कडे काही आहे की नाही, याची आर्यनला काहीच माहिती नव्हती. परंतु वा’दासाठी एनसीबी ङ्र’ग्ज सापडले आणि हे एक षड्यंत्र आहे, असे म्हणत आहे. आर्यनच्या वि’रोधातील कलम 27 अ हटविण्यात आलेले नाही. तसेच आर्यन सोबतच्या 7-8 लोकांकङील ङ्र’ग्ज ची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटले जात आहे.”
क्रूझ शिपवर 1300 लोक होते, मग आर्यन आणि अरबाज यांचाच फक्त संबंध कसा? क्रूझ शिपवर एकूण 1300 लोक हजर होते. असे असताना एनसीबीने फक्त आर्यन आणि अरबाज मध्येच संबंध असल्याचे सांगितले. हा षड्यंत्राचा आ’रोप म्हणजे फक्त योगायोग नव्हे तर हे कटकारस्थान आहे. जहाजावर कुणासोबत भेटीगाठी झाल्याच नाहीत, तर याला षड्यंत्र म्हणता येणारच नाही. हे सर्वजण एकत्र भेटणार, मग त्यांना ङ्र’ग्ज मिळणार आणि नंतर ते ङ्र’ग्जचे सेवन करणार, अशी चर्चा कुठेच नाही. त्यामुळे हे निव्वळ एक कारस्थान आहे” असे वक्तव्य रोहतगी यांनी मांडलं आहे.
जर एखाद्या हॉटेलमधील वेगवेगळ्या रूममध्ये सर्वजण आहेत आणि त्यांनी ङ्र’ग्जचे सेवन केले, तर ते सर्वजण षड्यंत्राचा भाग आहेत, असे कसे म्हणता येईल. कारण या प्रकरणात तसा काही ठोस पुरावा नाही. आर्यन हा फक्त अरबाज ला ओळखत होता. त्याशिवाय तो इतर कुणालाही ओळखत नाही. तेथेच या सर्वांची भेट झाली, हे सिद्ध करणे कठीण आहे. मात्र वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण षड्यंत्र आहे, हे दाखवण्यासाठी भेट होणे गरजेचे आहे, असे रोहतगी यांनी सांगितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.