लहानपणी “या” प्रसिद्ध अभिनेत्रीला अभ्यासाचा होता खूप कंटाळा, पण आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील आपल्या फेवरेट स्टार्सची एक छोटीशी झलक पाहण्यासाठी सुद्धा त्यांचे चाहते अतिशय उत्सुक असतात. त्यामध्येच जर फॅन्सना आपल्या लाडक्या सेलिब्रेटीचा लहानपणीचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ पाहायला मिळाला, तर मात्र त्यांचा आंनद अगदी गगनात मावेनासा होतो. हल्ली अशाच एका स्टारचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे, जो बहुतेकांना ओळखणे कठीण होऊन बसले आहे. आपल्या बॉलीवूड मधील एका फेमस अभिनेत्रीचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री आपल्या आईसोबत दिसत आहे. सध्या या अभिनेत्रीचा तसा चांगलाच बोलबाला आहे, कारण हिचे नाव बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान सोबत या अभिनेत्रींचे नाव जोडले जात आहे.

News,fatima sana shaikh

हा फोटो जरी त्या अभिनेत्रीचा असला तरीही तिच्या चाहत्यांसाठी मात्र हे ओळखणे खूप कठीण बसले आहे. कारण हा तिचा खूप लहानपणीचा फोटो आहे. तर मित्रांनो तुम्ही ओळखलेच असेल की, हा सोशल मीडियावर वायरल होत असलेला फोटो अभिनेत्री फातिमा सना शेख हिचा आहे. यामध्ये ती अभ्यास करताना दिसत आहे व तिच्या सोबत तिची आई देखील शेजारी बसलेली दिसत आहे. अभिनेत्री फातिमा सना शेख ही सध्या आमिर खान सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते.

See also  अभिनेता संजय दत्तवर फिदा होती ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री फातिमा सना शेख हिने आपल्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. “चाची ४२०” या सिनेमात अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या लहान मुलीची भूमिका फातिमानेच केली होती. त्याचप्रमाणे तिने बडे दिलवाला, वन टू का फोर या सिनेमांत सुद्धा लहानपणीच काम केले होते. तसेच अभिनेता आमीर खान याच्या “दंगल” चित्रपटात देखील अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

Fatima Sana Shaikh on her #MeToo story: It happened when I was very young -  Movies News

यामध्ये फातिमाने आमिरच्या मूलीचा रोल केला आहे. एवढेच नव्हे तर “ठग ऑफ हिंदुस्तान” मध्ये सुद्धा अभिनेत्री फातिमा सना शेख आणि आमिर खान यांची लव केमिस्ट्री दिसून येते. परंतु त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला. असे म्हणतात की, अभिनेत्री फातिमा सना शेख ही फिल्ङ मार्शल सैम मानकशॉ यांच्या बायोपिकमध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

See also  सार्वजनिक ठिकाणी या 7 प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींना जबरदस्तीने केले गेले किस, कॅमेऱ्यांमध्ये झाले कैद...

अभिनेता आमीर खान याने तब्बल 15 वर्षांनी आपली पत्नी किरण राव सोबत घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आमीर खान व किरण राव यांच्या नावासह फातिमा सना शेख चे नाव देखील सोशल मीडियावर चर्चेत येत होते. तसेच या दोघांचे अफेयर सुरू असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. थोडक्यात म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या मुळे आमीरने किरणला घटस्फोट दिला असे म्हटले जाते. अहो इतकंच नव्हे तर आता लवकरच आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर सुद्धा चढणार आहे बरं….

Fatima Sana Shaikh is overwhelmed with the audience's reaction to Ajeeb  Daastaans | Filmfare.com

मात्र आपल्या एका मुलाखतीमध्ये फातिमाने स्पष्टपणे सांगितले की, “सुरूवातीला मला या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. परंतु आता मला हे सर्व ऐकून खूप त्रास होतो. मी ज्या लोकांना ओळखत नाही, ज्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, ते माझ्याविषयी असे काहीही बोलतात.”

See also  अभिनेते सुनिल शेट्टी यांची होणारी सून आहे "या" प्रसिद्ध बिजनेसमॅनची मूलगी, खूपच लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करते ती

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment